Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून 10 कोटींचा घातला गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Margao Fraud Case: राज्यात सध्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. गोमंतकीय तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लाटण्यात आले.
अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!
Cash For JobCanva
Published on
Updated on

मडगाव: राज्यात सध्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. गोमंतकीय तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लाटण्यात आले. यातच आता, परदेशात चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी उकळल्याची घटना समोर आली आहे. अमेरिका आणि माल्टा यांसारख्या देशात नोकरी मिळवून देऊ असे सांगून दोन भामट्यांनी 150 जणांना 10 कोटीचा गंडा घातला. तत्पूर्वी, बाला आणि शांती राव बाला या भामट्यांविरोधात ग्रीन गोवा फाऊंडेशनसह पाच जणांनी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

परदेशात चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष

दरम्यान, अमेरिकासारख्या (America) प्रगत देशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं. परंतु या स्वप्नाचाच काहीजण फायदा घेतात. बाला आणि शांती राव बाला या भामट्यांनी याचाच फायदा घेवून लाखो रुपयांना गंडा घातला.

विशेष म्हणजे, परदेशात नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी गोव्यात एक ऑफिसही थाटले होते. मात्र अखेर या दोघांचा पर्दाफाश झाला. अमेरिका आणि माल्टा देशात नोकरी मिळवून देण्याचे आम्हाला या दोघांनी आश्वासन देवून लाखो रुपये घेतल्याचे तक्रारदारांनी मडगाव पोलिसांना सांगितले. आम्हाला नोकरी द्या नाहीतर आमचे घेतलेले पैसे परत करा असा तगादा लावला असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याचे देखील तक्रारदारांनी सांगितले.

अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!
Cash for Job Scam: त्या 'मॅडम'ला पकडून देण्याचा गोमंतकीयांनी निर्धार केलाय! Cash For Job प्रकरणावरुन सरदेसाई पुन्हा बरसले

पोलिस चौकशी

ग्रीन फाऊंडेशन आणि पाच तक्रारदारांनी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिस अॅक्शनमोड आले. पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची नोंद करुन घेतली. तसेच, चौकशी सुरु करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री कार्यालय, गोवा पोलिस (Goa Police) महासंचालक यांना विनंती केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोणत्याही सरकारी परवानगीशिवाय या भामट्यांनी कार्यालय चालवले असल्याचे देखील ग्रीन फाऊंडेशनकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com