Goa Carnival 2023  Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2023: कार्निव्हलमध्ये आता नवी प्रथा; आदल्या दिवशी ‘पडदा उघडणार'

गोव्यात पर्वरीत येथे कार्निव्हल म्हणजे किंग मोमोच्या राजवटीला प्रत्यक्षात शनिवार, 18 तारखेपासून राजधानी पणजीतून प्रारंभ होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Carnival 2023: गोव्यात कार्निव्हल म्हणजे किंग मोमोच्या राजवटीला प्रत्यक्षात शनिवार, 18 तारखेपासून राजधानी पणजीतून प्रारंभ होणार आहे. परंतु यावर्षी पर्वरी येथे आदल्या दिवशी शुक्रवार,17रोजी कार्निव्हलचा कर्टन रेझरचा (पडदा उघडणार) कार्यक्रम होणार आहे.

त्याचे उद्‌घाटन दुपारी 3.30 वाजता केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत पार पडेल, अशी माहिती सरपंच स्वप्नील चोडणकर यांनी दिली.

चोडणकर म्हणाले की, पर्वरी कार्निव्हल समितीच्यावतीने हा कर्टन रेझर कार्यक्रम पहिल्यांदाच पर्वरीत आयोजित केला जात आहे. लहान 17 ठिकाणांवर जो कार्निव्हल होणार आहे, त्यात पर्वरीचा समावेश आहे. पणजीतून 18 रोजी किंग मोमोच्या मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होईल.

चित्ररथ मिरवणूक एज्युकेशनल डिपार्टमेंटपासून बायपास रस्त्यावरून निघेल. दुपारी 3.30 वाजता सुरू होणारी मिरवणूक 6.30 वा.पर्यंत ती चालेल. त्यानंतर कार्यक्रमात निकाल जाहीर होईल. परंतु त्यांना बक्षीस पर्यटन खात्यांच्यावतीने दिली जातील, असे हरमलकर यांनी नमूद केले.

अशी आहेत बक्षिसे

या कार्यक्रमाची माहिती देताना अनुज हरमलकर म्हणाले की, कनिष्ठ गटात पर्वरीचा समावेश झाला आहे. पाच गटांची ही मिरवणूक असेल. त्यात कार्निव्हल मिरवणुकीत पारंपरिक गटात अनुक्रमे 75, 60, 45, 30 आणि 15 हजारांचे बक्षीस असेल.

क्लब आणि संस्थाच्या चित्ररथास अनुक्रमे 60, 50, 30, 20 आणि 12 हजार रुपये असे, फन ॲण्ड जंकमध्ये अनुक्रमे 20, 18,10, 8 आणि 5 हजारांचे बक्षीस असेल, फॅमिली गटात अनुक्रमे 20, 18, 10, 8 आणि 5 हजार रुपये, क्राऊन ॲण्ड जोकर (वैयक्तिक) गटात अनुक्रमे 12, 9, 7, 5 आणि 3 हजार रुपयांचे बक्षीस असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT