Jelly Fish: समुद्रकिनाऱ्यांवर जेलिफिश आढळण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले आहेत. त्याशिवाय या जेलिफिशकडून मागील तीन महिन्यांत 850 जणांना दंश झाल्याची नोंद दृष्टी जीवरक्षक दलाकडे झाली आहे. जेलिफिश हा मासा सहजासहजी जास्त विषारी नसतो, परंतु त्याचा दंश माणसाच्या त्वचेवर खाज आणतो किंवा माणसाला चीडचीड आणणारा ठरतो.
मागील तीन महिन्यांत एकूण 850 जेलिफिशची प्रकरणे नोंदविली, त्यात 140 उत्तर गोव्यात आणि 710 दक्षिण गोव्यामध्ये घडली आहेत. उत्तर गोव्यात कळंगुट, बागा आणि सिकेरी येथे अनुक्रमे 60,60 आणि 20 असे जेलिफिश दंश झाल्याची नोंदणी आहे.
दक्षिण गोव्याच्या संदर्भात सर्वाधिक आकड्यांसोबत (225) बेताळभाटी या समुद्रतटावर जेलिफिशद्वारे चावल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्याशिवाय बाणावली व झालोर या किनाऱ्यांवर प्रत्येकी 50 प्रकरणे घडली आहेत. यासोबत दक्षिण गोव्यात झालेल्या स्वीमथॉन या क्रीडाप्रकारामध्ये एकूण 125 जणांना जेलिफिशचा दंश झाल्याचे नमूद झाले आहे.
दृष्टी जीवरक्षक जेलिफिश हल्ल्यात बळी पडलेल्यांवर व्हिनेगर स्प्रेने उपचार करतात. विषारी द्रव्यांचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावित भागात गरम पाणी लावून उपचार केले जातात.
जेलिफिश टेंटॅकल्स बाहेर काढण्यासाठी चिमट्यांची उपलब्धता आहे. सूचनेसाठी पीए सिस्टमचाही वापर केला जातो.
सावधगिरीचे उपाय
जेलिफिशने दंश केल्यास जवळच्या जीवरक्षकाला कळवा किंवा लाइफसेव्हर टॉवरकडे जावा.
चावलेला भाग गरम पाण्याने धुवा (आपण सोसण्याइतपत गरम) कारण उष्णतेमुळे विषारी द्रव्ये खाली जातात.
वेदना आणि सूज कमी करण्यासाठी चावलेल्या भागावर बर्फ ठेवा.
छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या व्यक्तींनी ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.