Goa Carnival Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2025: कार्निव्हलची तयारी जोरात! किंग मोमोचे राज्य सुरू होणार; शोभायात्रेला पर्वरीतून होणार सुरवात

Goa Carnival: किंग मोमो हे या शोभायात्रेचे खास आकर्षण असते. कला पथकांची तसेच कलाकारांची सध्या तयारी जोरात सुरू आहे.

Sameer Panditrao

Goa Carnival parade and King Momo celebration

पणजी: खा, प्या, मजा करा असा संदेश देणाऱ्या कार्निव्हलची राज्यात जय्यत तयारी सुरू झाली आहे. सरकारी पातळीवर काढण्यात येणाऱ्या कार्निव्हल शोभायात्रांना २८ फेब्रुवारीपासून पर्वरी येथून सुरवात होणार आहे.

कार्निव्हलनिमित्त पर्यटन खात्यातर्फे राज्यातील विविध भागात शोभायात्रा काढण्यात येतात. या शोभायात्रांत विविध चित्ररथ, कलापथके, कलाकार आपली कला पेश करीत असतात. किंग मोमो हे या शोभायात्रेचे खास आकर्षण असते. कला पथकांची तसेच कलाकारांची सध्या तयारी जोरात सुरू आहे.

गोवा सज्ज

कार्निव्हलने गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. या शोभायात्रा पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात. गोव्याची लोकसंस्कती, लोककलेबरोबरच आधुनिक गोव्याचेही दर्शन यात घडते. येत्या २८ फेब्रुवारीपासून राज्यात किंग मोमोचे राज्य सुरू होणार आहे, त्यासाठी गोवा सज्ज झाला आहे.

मळ्यातील चित्ररथ लक्ष वेधणार

मळा, पणजी येथील युवक सध्या चित्ररथ तयार करण्यासाठी मेहनत घेत आहेत. हा चित्ररथ पारंपरिक आणि आधुनिक गोव्याचे दर्शन घडवणार आहे. गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचा अनोखा ठसा यात दिसणार आहे. विविध देखावे, लोकसंगीत आणि आकर्षक प्रकाशयोजना यामुळे हा चित्ररथ लोकांचे लक्ष वेधणार आहे. कागदाचा लगदा आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून हा देखावा साकारला आहे. यावर्षी कार्निव्हलमध्ये पर्यावरणपूरक थीमवर आधारित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT