Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa News: काणकोणमधील वीज समस्या सोडविणार- सुदिन ढवळीकर

Goa News: गोवा सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात हरित ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: काणकोणमधील वीज समस्या सोडविण्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल शनिवारी काणकोण दौऱ्यावेळी दिले. विधानसभेत प्रत्येक मतदारसंघात दोनशे कोटी याप्रमाणे ऐंशी कोटी रुपयांचा निधी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी देण्याचे जाहीर केले होते. मात्र, हा निधी काणकोणसारख्या मतदारसंघात अपुरा आहे.

पहिल्या नियोजनाप्रमाणे केंद्र सरकारच्या वीज मंत्रालयाने 723 कोटींचा निधी दिला होता. आता 30 डिसेंबरला केंद्रीय वीज मंत्रालयाची बैठक होणार आहे. त्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत राज्याचे वीजसंदर्भातील दुसरे नियोजन मंत्रालयाला सादर करणे गरजेचे आहे. त्यामध्ये किमान 1600 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.

त्यामध्ये अपग्रेडेशन ऑफ सबस्टेशन, कृषी, वन व किनारी भागांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याशिवाय सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात हरित ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये सौरऊर्जा, बायोमास प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सौरऊर्जेचे दोन पायलट प्रकल्प एक आदर्श ग्राम येथील बलराम शिक्षण संस्थेत व दुसरा फोंडा येथे राबविण्यात येणार आहे.

यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी काणकोणमधील वीजसमस्या सोडविण्यासाठी वीजमंत्र्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे ठरविल्याने त्यासाठी काणकोणमधील पंच, सरपंच व पालिकेने आपल्या मागण्या पुढे आणण्याचे आवाहन केले.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या श्रीस्थळ येथील विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीला नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, नगरसेवक, सरपंच, पंच व भाजपचे कार्यकर्ते तसेच वीज खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

भूमिका जुनीच...

नरकासुराला देणगी देण्यासंबंधीची आपली भूमिका आजची नाही. 2002 पासून या भूमिकेला चिकटून आहे. त्यामुळे कोणच्याही विरोधात मी नाही व त्या वादात पडण्यात मला स्वारस्य नाही. प्रत्येकाने आपली संस्कृती जपण्यासाठी ध्येयधोरणांना चिकटून राहणे गरजेचे असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT