Vishwajeet Rane : आयुर्वेदाला भरपूर वाव आणि भविष्य आहे; आरोग्य मंत्री विश्वजित राणे

आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे एकात्मिक मॉड्यूल लागू करणारे गोवा हे पहिले राज्य आहे; असे विधान आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी केले
Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: आयुर्वेद आणि ऍलोपॅथीच्या एकात्मक उपचार पद्धतीचा वापर करणारे देशातील आदर्श आणि पाहिले राज्य मानावे लागेल. आयुर्वेदाला राज्यात भरपूर संधी असल्याने आम्ही त्या पद्धतीने काम करत आहोत.

(Goa first state to implement integrated module of Ayurveda and Alopathy statement by vishwajeet rane )

Vishwajeet Rane
Traffic In Chorla Ghat: चोर्ला घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी! 'अवजड' वाहनांची पुन्हा गर्दी

पूर्वी या दोन उपचार पद्धती एकर एकत्र वापरण्यावरती अनेक निर्बंध होते जे आता नाहीशी झाले आहेत असे मत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केले आहे. आजच्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

8 डिसेंबर रोजी आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन करणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

 राज्यात पुढील महिन्यापासून 41 ठिकाणी आयुर्वेदिक केंद्रे सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. दरम्यान, येत्या 8 डिसेंबर रोजी आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगीतले.

गोव्यातील आरोग्य संचालनालय सर्व क्षेत्रातील वैद्यकीय सुविधा हाताळते. त्यामुळे या संचालनालयावरील ताण वाढत आहे. गोव्यात होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टरांची संख्या तसेच वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ होत आहे.

Vishwajeet Rane
Goa Farming: गोवन ब्रँड म्हणून नाचणी पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देणार; CM प्रमोद सावंत

या पार्श्र्वभूमीवर सरकार होमिओपॅथी व आयुष वैद्यकीय सेवांसाठी वेगळे संचालनालय सुरू करणार असल्याचे जलस्रोत मंत्री तसेच शिरोडा येथील कामाक्षी होमिओपॅथी महाविद्यालय व इस्पितळाचे संस्थापक संचालक सुभाष शिरोडकर यांनी सांगितले होते.

600 विद्यार्थ्यांचा कॅम्पस

पेडणे येथील आयुष इस्पितळ, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे महाविद्यालय पुढील वर्षी सुरू होईल. येत्या डिसेंबरमध्ये आयुर्वेदिक शिक्षण संस्थांचे उद्‍घाटन तेथे केले जाईल. तेथे 600 विद्यार्थ्यांचा कॅम्पस असेल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग व आयुर्वेद संपूर्ण जगात पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com