Canacona News Dainik Gomantak
गोवा

Canacona News: विहिरीतील मृत कासव काढताना दोघांचा बुडून मृत्यू

नमी आणि बारकेलो हे दोघेही पोहण्यात तरबेज होते. तरीही त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News: गुळे येथे विहिरीतील मृत कासव काढण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (शुक्रवारी) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. नमी गावकर (रा. गुळे) आणि बारकेलो गावकर (गोकुल्डे-बार्शे) अशी या दोघांची नावे आहेत.

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नमी आणि बारकेलो हे दोघे आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गुळे येथे विहिरीतील मृत कासव काढण्यासाठी पाण्यात उतरले होते.

ते दोघेही विहिरीत बुडाल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि काणकोण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बुडालेल्यांना वर काढले. विशेष म्हणजे, नमी आणि बारकेलो हे दोघेही पोहण्यात तरबेज होते.

तरीही त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ते दोघेही पेट्रोल पंपवर काम करत होते. ही घटना घडल्यानंतर पेट्रोल पंपवर जमाव जमला. लोकांना आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT