Dussehra 2022  Dainik Gomantak
गोवा

Dussehra 2022: लोलयेत श्री संकर्षण देवालयात भाविकांची अलोट गर्दी!

Dussehra 2022: लोलये पंचायत क्षेत्रातील श्री संकर्षण देवालयात दसरोत्सव साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Dussehra 2022: काणकोण लोलये पंचायत क्षेत्रातील श्री संकर्षण देवालयात दसरोत्सव साजरा करण्यात आला. नवरात्री उत्सवानिमित्त गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर काल दहाव्या दिवशी दसरा सण साजरा करण्यात आला. या देवालयाचा दसरोत्सव बांध संस्कृतीशी संबंधित आहे, असे येथील प्रमुख विनोद वारीक यांनी सांगितले.

वारीक, प्रभूगावकर आणि सुदीर परिवारातील घटकांची या उत्सव विधीत प्रमुख सहभाग होता. एक संकर्षण सतीचे तरंग व एक श्री निराकार देवाचे तरंग अशी दोन तरंगा या दसरोत्सवात असतात. त्याशिवाय भगत, जाण यांचाही समावेश असतो.. श्री संकर्षण देवालयात अवतार व कौल प्रसाद झाल्यानंतर दसऱ्याचा लवाजमा माशे येथील श्री निराकार देवालयात येतो.

तसेच, त्यानंतर माशे येथील पठारावर असलेल्या कडंब वृक्षाची पूजा केल्यानंतर त्याची पाने सोने म्हणून लुटण्यात येतात. ती एकमेकांना भेट म्हणून देण्याची प्रथा आहे. त्यानंतर लवाजमा वाजत गाजत माशे येथून आगसमार्गे वाजत गाजत लोलये येथील ग्रामदैवत श्री केशव देवालयात प्रवेश करतो तिथे भाविकांना कौल प्रसाद दिल्यानंतर पुन्हा लवाजमा श्री संकर्षण देवालयात येऊन विधिपूर्वक दसरोत्सवाची सांगता केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT