Goa Lokotsav 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Lokotsav 2022: यंदाचा काणकोण लोकोत्सव विविध आकर्षणाने रंगणार, खास वनौषधींचेही प्रदर्शन

Goa Lokotsav 2022: 12 राज्यातील शेकडो लोककलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Lokotsav 2022: यंदाचा काणकोण लोकोत्सव अधिक व्यापक करण्यात आला असून लोककला, लोकनृत्य, पारंपारिक वनौषधी प्रदर्शन, खाद्यपदार्थ, हस्तकला प्रदर्शन, कंद मुळाचे प्रदर्शन, शेती अवजारांचा प्रदर्शन, साहसी खेळांच्या स्पर्धा अशा विविध आकर्षणाने तो रंगणार आहे. 12 राज्यातील शेकडो लोककलाकार या महोत्सवात सहभागी होत आहेत.

आजपासून 11 डिसेंबरपर्यंत तो चालेल अशी माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिली. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी एससीएसटी आयोगाचे दिलीप करमळकर आणि आदर्श सेवा संघाचे गावकर उपस्थित होते.

सभापती तवडकर म्हणाले, महोत्सवाचे उद्‍घाटन 9 डिसेंबर रोजी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. याशिवाय केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पोवार, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, उपसभापती देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील बहुतांश मंत्री सहभागी होत आहेत.

7 डिसेंबर रोजी महिला सशक्तीकरणाच्या निमित्ताने महिलांविषयीचे विविध कार्यक्रम होतील. तर 8 डिसेंबर रोजी स्वयंपूर्ण युवा अंतर्गत मेगा जॉब फेअरचा आयोजन केले असून रोजगार संधी आणि करिअर मार्गदर्शन करण्यात येईल.

शेती अवजारे आणि साहसी उपक्रम

यंदा या महोत्सवात पारंपारिक वनऔषधीचे प्रदर्शन आणि विक्री असेल. यात काणकोण, केपे, सांगे, धारबांधोडा या तालुक्यातील सुमारे 100 हून अधिक वैद्य वनऔषधे घेऊन आपल्या भेटीला येतील. याशिवाय कंद मुळाचे प्रदर्शनही असेल.

या महोत्सवाचे खास आकर्षण असेल शेती यंत्रांचे प्रदर्शन याबरोबरच यंदा या महोत्सवात पारंपारिक खेळांच्या आयोजनाबरोबर साहसी उपक्रम ही आयोजित केले आहेत अशी माहिती सभापती तवडकर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: गिरे तो भी टांग उपर! पैशापुढे झुकला 'पाक', आयसीसीच्या चक्रव्यूहात अडकले आसिफ मुनीर अन् शरीफ; रविवारी रंगणार हाय-व्होल्टेज मुकाबला

Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेच्या नावाखाली 'भामट्यांचा' सुळसुळाट; नोकरीच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका, रेल्वे प्रशासनाचे आवाहन!

BITS Pilani Controversy: बीट्स पिलानी प्रकरणाचा छडा लावा, अन्यथा...; एनएसयुआयचा संतप्त इशारा, राज्यपालांच्या हस्तक्षेपासाठी साकडे

Goa Drug Case: 4 वर्षांपासून कोठडीत, तरीही सुटका नाही; गिनीच्या ड्रग्ज तस्कराचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने ओढले ताशेरे

Bison In Goa: फोंड्यात गव्यांचा भररस्त्यात 'नाईट आऊट'! खडपाबांध ते ढवळी परिसरात नागरिकांची उडाली घाबरगुंडी; वन खात्याकडे बंदोबस्ताची होतेय मागणी

SCROLL FOR NEXT