Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

गोवा गॅंग ऑफ वासेपुर बनू शकतोः विजय सरदेसाई

जेव्हा गोव्याचा प्रमुखच खनिज वाहतुकीच्या ट्रिप्स मोजू लागतो, तेव्हा गोवा गैंग ऑफ वासेपुर बनू शकतो अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोमंतकीयांना पिस्तुल दाखविण्यासाठी भूमिपुत्र गोव्यात पोहचलेले असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारल्यास रात्री फिरल्यास पिस्तुल दाखविणारचं असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडून मिळण्याची अपेक्षा आहे. जेव्हा गोव्याचा प्रमुखच खनिज वाहतुकीच्या ट्रिप्स मोजू लागतो, तेव्हा गोवा गॅग ऑफ वासेपुर बनू शकतो, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी केली.

मुरीडा फातोर्डा येथील नाल्याची पाहणी केल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील टीका केली. सरदेसाई पुढे म्हणाले, कंलगुटमध्ये देशी कट्टा सापडल्याने गोमंतकीयांना पिस्तुल दाखविण्यासाठी भूमिपुत्र गोव्यात पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यात खाण व जलद पैसे स्त्रोत वाढतात तेव्हा पिस्तुल संस्कृती गोव्यात येऊ शकते. यावर पोलिसांनी योग्यरित्या स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. गोवा पोलिस सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या सारखे वक्तव्य करु लागलेले असून पोलिसांनी पोलिसांसारखे वागणे आवश्यक आहे.

गोव्यात खून, बलात्कार व अन्य गुन्ह्यांमध्ये वाढ होत चाललेली असून पोलिसांनी कुठल्याही प्रकरणाचा छडा लावण्यापूर्वी गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. राज्यात विरोधी पक्ष एकत्र नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाने गोवा विकायला काढलेला आहे, असा आरोप विजय सरेदसाई यांनी केला. तर, सत्ताधारी पक्षाचा गोवा व गोमंतकीय विरोधी कृत्यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष सतत पर्दाफास करीत राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT