Goa Dainik Gomantak
गोवा

गोवा राज्य ‘कॅसिनो कॅपिटल’; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचे 'प्रमोशन' धोरण

"देशभरातील लोकांनी गोव्यातील कॅसिनोला मान्यता दिली आहे. आवश्यकता वाटल्यास गोवा राज्य ‘कॅसिनो कॅपिटल’ म्हणून प्रमोट करू", असे केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Goa: आवश्यकता भासल्‍यास गोवा राज्य ‘कॅसिनो कॅपिटल’ (Casino) म्हणून प्रमोट केले जाईल, असे केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. पणजीच्या (Panjim) पर्यटन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे उपस्थित होते.

रेड्डी म्हणाले की, देशात गोवा आणि सिक्कीम (Sikkim) या दोनच राज्‍यांमध्‍ये कॅसिनो उद्योग आहे. मात्र, देशभरातील लोकांनी गोव्यातील कॅसिनोला मान्यता दिली आहे. त्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज नाही. पण आवश्यकता वाटल्यास गोवा राज्य ‘कॅसिनो कॅपिटल’ म्हणून प्रमोट करू. गोव्यात देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येेने येतात.

मंत्री रेड्डी यांच्या हस्ते शनिवारी आग्वाद किल्ला, से कॅथेड्रल चर्च आणि कुर्डी येथील श्री महादेव मंदिरात येणाऱ्यांसाठी विशेष सुविधांचा प्रारंभ करण्यात आला. रोषणाई, पार्किंग, सौंदर्यीकरण प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. देशातील आघाडीची ७५ पर्यटनस्थळे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित केली जाणार आहेत अशी माहिती रेड्डी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT