वार्का येथील कॅसिनोच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण; चार जणांना अटक

आरोपींनी सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण केली व कॅसिनोच्या काचा फोडून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान केले.
Crime
Crime Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Crime: ओळखपत्र (Identity card) नसल्याने तसेच कोविड (Covid-19) चाचणी प्रमाणपत्र नसल्याने कॅसिनोत प्रवेश करण्यास निर्बंध केल्याने सुरक्षा रक्षकाला मारहाण करून कॅसिनोची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली कोलवा पोलिसांनी चारजणांना अटक केली.

Crime
Goa Rain Updates: ‘जवाद’ चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम होणार नाही

ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास वार्का येथील झुरी हॉटेलमधील कॅसिनोत (Casino) घडली. पहाटेच्या वेळी चौघेजण तेथे आले असता सुरक्षा रक्षक राजेंद्र पाल याने त्यांना अडवून ओळखपत्र मागितले. यावेळी संतापलेल्या युवकांनी त्याला जबर मारहाण केली आणि कॅसिनोच्या काचा फोडून सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान केले.याप्रकरणी पोलिसांनी व्हेनान्सियो परेरा (40), विल्यम डायस (36), सायमन डायस (36) आणि जोसेफ फर्नांडिस (28) या चारजणांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com