Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime News: कांदोळी येथे कर्नाटकमधील युवकांवर जीवघेणा हल्ला; जखमींवर बांबोळी इस्पितळात उपचार सुरू

Calangute Crime News: दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute Crime News: ओर्डा-कांदोळी येथील आईस फॅक्टरी परिसरात शुक्रवारी (ता.२२) दुपारी संशयित सॅम मायकर राठोड ऊर्फ शंकरप्पा (सध्या राहणारा कांदोळी, मूळ विजापूर-कर्नाटक) याने अजित रूपसिंग राठोड, मिथुन शिवानंद पवार तसेच अशोक चव्हाण या कर्नाटकमधील तरुणांवर (सध्या राहणारे तिघेही कांदोळी) जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची तक्रार कळंगुटच्या पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

हा हल्ला स्थानिक मिथुन पवार तसेच संशयित सॅम ऊर्फ शंकरप्पा राठोड यांच्यात असलेल्या पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी तरुणांवर सध्या बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत.

संशयित सॅम ऊर्फ शंकरप्पा राठोड याच्याविरोधात या जीवघेण्या हल्ल्यासंदर्भात कळंगुट पोलिस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुटचे पोलिस उपनिरीक्षक हरिष वायंगणकर तसेच निरीक्षक परेश नाईक याबाबतीत पुढील तपास करीत आहेत.

काही महिन्यांपूर्वी कांदोळी येथील एका हॉटेल्स मध्ये सूचना सेठ नावाच्या महिलेने आपल्या बाळाचा खून केल्यानंतर कांदोळी हा भाग मोठ्या प्रमाणावर चर्चेला आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LPG Price Hike: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, पाहा नवे दर

Arpora Nightclub Fire: नाईटक्लबवर मेहेरबानी भोवली; हडफडे पंचायत सचिव बडतर्फ तर सरपंच अपात्र! कारवाईचा बडगा कठोर; आता नंबर कोणाचा?

Horoscope: नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात! 'या' राशींचे भाग्य उजळणार, वाचा तुमचे भविष्य

सारा तेंडुलकरच्या हातातील 'त्या' बाटलीवरुन सोशल मीडियावर गदारोळ! गोव्यातील व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सचिनच्या लेकीला केलं ट्रोल VIDEO

Bollywood: 2025 गाजवले छावा, धुरंधरने! सलमानसह अनेक स्टार्सचे सिनेमे फ्लॉप; वाचा 'या' वर्षाचा बॉलिवूडचा आलेख

SCROLL FOR NEXT