Calangute Couple Viral Video Dainik Gomantak
गोवा

Calangute: कळंगुटमधील शॉपमध्ये कपडे बदलणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल; स्थानिकांकडून संताप व्यक्त

Calangute Couple Viral Video: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या कळंगुटमध्ये नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका कपड्याच्या शॉपमध्ये एक जोडपे चक्क सार्वजनिक ठिकाणी कपडे बदलताना आढळले.

Manish Jadhav

कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या कळंगुटमध्ये नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका कपड्याच्या शॉपमध्ये एक जोडपे चक्क सार्वजनिक ठिकाणी कपडे बदलताना आढळले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून संताप व्यक्त केला जात आहेत.

दरम्यान, ही धक्कादायक घटना कळंगुटमधील (Calangute) एका नामांकित शॉपमध्ये घडली असल्याचे सांगितले जात आहे. शॉपमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये टिपलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यात संबंधित जोडपे थेट शॉपमध्येच कपडे बदलताना दिसत आहेत. ही कृती सार्वजनिक शिस्त आणि शालीनतेच्या मर्यादा ओलांडणारी असल्याने या प्रकारावर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक संतप्त

दुसरीकडे, या प्रकारामुळे स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. एवढचं नाहीतर पर्यटन व्यवसायावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली. कळंगुट व्यापारी संघटनेचे सदस्य गणेश नाईक यांनी सांगितले की, "गोवा हे पर्यटनासाठी सुरक्षित ठिकाण मानले जाते. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे गोव्याची प्रतिमा मलिन होत आहे."

पोलीस तपास सुरु

या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. व्हिडीओतील व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु असून पोलिसांकडून ही घटना अत्यंत गंभीरतेने घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेकांनी हे वर्तन अमर्याद आणि समाजविघातक असल्याचे म्हटले. काहींनी गोव्यातील (Goa) पर्यटन धोरणावर देखील प्रश्न उपस्थित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT