Goa Congress | Vijay Bhike Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: डान्‍स बारवरील कारवाई हप्‍तावाढीसाठी का? काँग्रेसने साधला लोबोंवर निशाणा

Goa Congress: काँग्रेसचे नेते विजय भिके यांनी या कारवाईबाबत शंका व्‍यक्त केली.

दैनिक गोमन्तक

Goa Congress: कळंगुट पंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील कथित डान्स बारवर कारवाई केल्‍याचे ऐकिवात आहे. पण ही कारवाई खरीच होती की हप्‍त्‍याचे दर वाढविण्यासाठी, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते विजय भिके यांनी या कारवाईबाबत शंका व्‍यक्त केली. आज येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. रोशन चोडणकर यांची उपस्थिती होती.

मागील पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ कळंगुट मतदारसंघात भाजपचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे हे बेकायदा डान्‍सबार व आस्थापने कशी आली ते अगोदर सांगावे. डान्स बारवरील कारवाई ही खरोखर होती की तो एक देखावा होता, असा सवाल विचारून भिके यांनी आमदार मायकल लोबो तसेच स्थानिक पंचायतीला लक्ष्य केले

कळंगुटमध्ये बेकायदा गोष्टी सुरू आहेत हे स्थानिक आमदार आपल्या विधानांतून मान्य करतात. मागील कित्येक वर्षे तेच कळंगुटचे नेतृत्व करीत आहेत. मग या बेकायदा कृत्‍यांना जबाबदार कोण? सध्या भाजपचेच सरकार आहे. शिवाय मध्यंतरी लोबो हे मंत्री होते. याचाच अर्थ राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढेपाळली आहे हे लोबो अप्रत्यक्ष मान्य करतात, असे म्हणत भिकेंनी लोबोंवर निशाणा साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT