Goa News | Tower Dainik Gomantak
गोवा

Goa News: कळंगुटमध्ये टॉवरला ग्रामस्थांचा विरोध!

Goa News: कळंगुटपाठोपाठ बार्देशातील कामुर्ली गावातील नागरिकांनी भरवस्तीत मोबाईल टॉवरच्या बांधकामास हरकत घेत जोरदार विरोध केला.

दैनिक गोमन्तक

Goa News: सध्या शाळांना सुट्टी असल्याची संधी साधून 21 ऑक्टाबरला शुक्रवारी सकाळी सावतावाडो-कळंगुट येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात टॉवरच्या बांधकामासाठी जागेची पाहणी करण्यास आलेल्या कंत्राटदार तसेच कामगारांना शाळेच्या पीटीए समिती तसेच स्थानिकांनी हुसकावून लावले.

गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्नरत असलेल्या मोबाईल टॉवरच्या बांधकामास शिवोली पंचक्रोशीत प्रखर विरोध करण्यात आल्यानंतर तेथून संबंंधितांना त्यांचे बस्तान गुंडाळावे लागले होते. यासंबंधात स्थानिक ग्रामस्थांनी शाळेच्या पालक-शिक्षक समितीसमवेत कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा यांची भेट घेत त्यांना या बांधकामासंबंधात जाब विचारला व टॉवरला जोरदार हरकत घेतली.

सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी या टॉवरच्या बांधकामाबाबत पंचायत मंडळ अनभिज्ञ असल्याचे सांगितले व त्यास विरोध दर्शविणारा ठराव मंजूर करून सरकारला पाठवणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.

तसेच, या भागात कार्यरत असलेल्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरतात. सध्या दिवाळीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने पालक-शिक्षक संघ तसेच ग्रामस्थांना अंधारात ठेवून मोबाईल टॉवरच्या बांधकामासाठी संबंधित कंत्राटदार कामगारवर्गासहित शाळेच्या आवारात जमा झाले होते.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक

शक्तिशाली प्रसरण क्षमतेचा मोबाईल टॉवर शाळेच्या आवारात उभारल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची भीती असल्याचे पालक-शिक्षक संघाचे दत्ता आसगावकर, तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोरगावकर यांनी सांगितले.

लोकवस्तीपासून दूर बांधकाम करा...

कळंगुटपाठोपाठ बार्देशातील कामुर्ली गावातील लोकांनीही भरवस्तीत मोबाईल टॉवरच्या बांधकामास हरकत घेत जोरदार विरोध केला. यावेळी कामुर्लीच्या सरपंच छाया गाड, उपसरपंच संजना माशेलकर व लोकांनी रस्त्यावर ठाण मांडला.

परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी सरपंच छाया गाड व इतरांनी या मोबाईल टॉवरचे बांधकाम भरवस्तीत करण्याऐवजी लोकवस्तीपासून दूर स्मशानभूमी परिसरात करण्याचे कंत्राटदार व अधिकाऱ्यांना आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

IFFI 2024: ‘विषय हार्ड’; मानवी संबंधांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT