Goa Cabinet Meeting | Dainik Gomantak  
गोवा

Goa Cabinet Meeting: अ, ब वर्गातील नोकरभरतीसाठी कोकणीचे ज्ञान बंधनकारक; जाणून घ्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

स्मार्ट सिटीची कामे जूनपर्यंत पूर्ण होणार - बाबूश मोन्सेरात

Akshay Nirmale

Goa Cabinet Meeting: गोव्यातील राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज, बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात अ, ब वर्गातील नोकरभरतीसाठी कोकणीचे ज्ञान बंधनकारक असेल, असा निर्णय झाला आहे.

मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्णयांची माहिती दिली.

त्यानुसार आता डीडीएसएसव्हाय आरोग्य कार्डधारकांना आभा कार्ड नोंदणी बंधनकारक असणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री सरल उद्योग सहाय्य योजनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यातून उद्योग करू इच्छिणाऱ्यांना मदत मिळणार आहे.

याशिवाय अ आणि ब वर्गातील नोकरभरतीसाठी कोकणी भाषेचे ज्ञान असणे आता बंधनकारक केले गेले आहे.

दरम्यान, राज्यातील जमिन हडप प्रकरणांच्या एसआयटीचा अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत येणार होता, अशी चर्चा होती. तथापि, हा अहवाल बैठकीत मान्यतेसाठी आला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीची कामे जूनपर्यंत पूर्ण होणार - बाबूश मोन्सेरात

पणजीतील स्मार्ट सिटीची कामे जून महिन्यापर्यंत पूर्ण होतील. जी२० च्या बैठका आणि पावसामुळे या कामाला विलंब झाला. स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्स यांच्याशी माझे बोलणे झाले आहे.

त्यांनी मला हे काम जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी खात्री दिली आहे, अशी माहिती महसूल मंत्री आणि पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दिली. मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांनी त्यांना स्मार्ट सिटीच्या कामाबाबत विचारल्यावर त्यांनी ही माहिती दिली.

नव्याने काम करताना काही जुनी कामे, यंत्रणा बदलावी लागत आहेत. त्यामुळे विलंब लागत आहे. तथापि, पणजी निश्चित्तपणे स्मार्ट होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stone Exhibition: दगडात शोधला 'देव'! पर्येच्या परेशने भरवले अनोखे प्रदर्शन

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट खून प्रकरणातील आरोपीला विदेशात जाण्याची परवानगी; बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडोनेशियाला जाणार

Goa Postcard Campaign: संत मीराबाई शिल्पाची 31 वर्षे, 5 दिवसात 3184 पोस्टकार्डांचा विक्रम

Goa Sand Mining: महिन्याभरात पाऊस थांबेल, विकासकांची बांधकामे वेग पकडतील; वाळू समस्येचे ‘गँग्रीन’

नवी कोरी गाडी घातली समुद्रात! सुरक्षारक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष, हणजूण किनाऱ्यावर पर्यटकाची फजिती; Watch Video

SCROLL FOR NEXT