Konkan Railway: थिवी रेल्वे स्थानकावर एक्झिक्युटिव्ह लाऊंजचे उद्घाटन; रिक्लायनर चेअर्स, म्युझिक अन् कॅफेटेरिया सुद्धा...

कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी सुविधा
Executive lounge at Thivim Railway Station:
Executive lounge at Thivim Railway Station: Dainik Gomantak

Executive lounge at Thivim Railway Station: रेल्वे प्रवाशांना उत्कृष्ट अनुभव देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गोव्यातील थिवी रेल्वे स्थानकावर एक्झिक्युटिव्ह लाऊंजचे गुरूवारी उद्घाटन करण्यात आले. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेचे ऑपेरेन्शन्स अँड कमर्शिअल्सचे संचालक संतोष कुमार झा यांच्यासह कोकण रेल्वेचे अधिकारी, तसेच लाऊंजची व्यवस्थापकीय टीम यावेळी उपस्थित होती.

Executive lounge at Thivim Railway Station:
कन्येच्या गोव्यातील वादाबाबत काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी; सिली सोल्स कॅफे अँड बार प्रकरण

84.10 चौरस मीटर क्षेत्रात हा लाऊंज असून येथे सोफा, रिक्लायनर खुर्च्या, अँबियन्स लायटिंग, म्युझिक, कॅफेटेरिया, टुरिस्ट रिसेप्शन सेंटर अशा सुविधा आहेत.

संपूर्ण एसी सुविधेसह येथे 37 लक्झरी सीट्स आहेत. मोफत वायफाय, रिडिंग गॅलरी, ट्रेन इन्फर्मेशन डिस्ल्पे, कॉम्प्लिमेंटरी शू पॉलिश, वर्क स्टेशन्स, चार्जिंग, गोवा सुवेनियर स्टोअर आणि टिव्ही अशा सुविधा येथे आहेत.

या एक्झिक्युटिव्ह लाऊंजचे किमान शुल्क दोन तासांसाठी प्रतिव्यक्ती 50 रूपये इतके आहे. वैयक्तिक वापरांवरून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

कोकण रेल्वेतर्फे मार्गावर विविध स्टेशन्सवर विविध सुविधा दिल्या जात आहे. गोव्यातीलच मडगाव येथे पॉड हॉटेल्सची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. जेणे करून प्रवासी काही काळ तिथे राहू शकतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com