Goa Cabinet Decision: गोव्यात 5G नेटवर्कच्या पायाभूत सुविधांसाठी टेलीकॉम धोरणांत सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता गोव्यातील टेलिकॉम धोरण हे केंद्र सरकारप्रमाणेच असणार आहे.
या धोरण बदलाबाबत आज, मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आता केंद्राच्या टेलॉकॉम धोरणाप्रमाणेच राज्याचे टेलीकॉम धोरण असेल, असे सांगितले जात आहे. (5G in Goa)
दरम्यान, गोव्याची राजधानी पणजी शहर यापुर्वीच ‘जिओ ट्रू 5-जी’ नेटवर्कशी जोडले गेले आहे. जिओतर्फे देशातील 17 राज्यांतील 50 शहरांमध्ये एकाच दिवशी 5-जी सेवा सुरू करण्यात आली होती. त्यात पणजीचाही समावेश होता.
त्यामुळे आता युजर्सना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 जीबीपीएस+ वेगाने अमर्यादित डेटा मिळत आहे.
जिओच्या प्रवक्त्याने तेव्हा सांगितले होते की, “पणजी शहरात 5-जी सेवा सुरू करणारा जिओ ही पहिलीच कंपनी ठरली आहे. जिओ ट्रू 5-जी तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह पणजीत चांगली सेवा देईल. गोव्यातील लोकांना प्रगत आरोग्य सेवा क्षेत्रात त्याचा फायदा होणार आहे.
कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. गोवा डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही गोवा सरकारचे आभारी आहोत.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.