Konkani Literature Festival: 22 व्या युवा कोकणी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; अध्यक्षपदी 'या' लेखकाची निवड

आसगाव येथे आयोजन
Konkani Literature Festival
Konkani Literature FestivalDainik Gomantak

Konkani Academy: कोकणी अकादमी आणि ज्ञान प्रसारक मंडळ महाविद्यालय आसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या 22 व्या युवा कोकणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून युवा साहित्यिक आणि पत्रकार मार्कुस गोंसाल्विस यांची निवड करण्यात आली आहे. दोन दिवसांचे हे संमेलन 17 आणि 18 मार्च रोजी आसगाव येथे होणार आहे.

Konkani Literature Festival
H3N2 Virus : गोवा सरकार H3N2 व्हायरससाठी प्रतिबंधात्मक बैठक घेणार; विश्वजित राणेंची माहिती

मार्कुस गोंसाल्विस हे व्यवसायाने पत्रकार असले तरी त्यांनी कविता, कथा, नाट्य, तियात्र लेखन अशा विविध विषयात साहित्य निर्मिती केली असून रोमी आणि देवनागरी या दोन्ही लिपीतून त्यांनी कोकणी साहित्य निर्माण केले आहे.

त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना गोवा सरकारचा 'युवा सृजन', कोकणी अकादमीच्या 'युवा साहित्यीक' तसेच गुलाब साहित्यीक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या कित्येक बाल तियात्र संहिताना पहिल्या क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com