Goa Cabinet Decision Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet: हिंसक कुत्र्यांमुळे धोका निर्माण होत असल्याने गोव्यात पिटबुल आणि रॉटव्हेलर पालनावर बंदी!!

Pitbull and Rottweilers Ban: गोवा सरकारने पिटबुल आणि रॉटव्हेलर कुत्र्यांच्या आयात, विक्री आणि प्रजनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे

Akshata Chhatre

पणजी: गोवा सरकारने पिटबुल आणि रॉटव्हेलर कुत्र्यांच्या आयात, विक्री आणि प्रजनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. गोवा प्राणी प्रजनन, घरगुती नियम आणि नुकसान भरपाई अध्यादेश २०२४ मध्ये सुधारणा करत सरकारने या नवीन निर्णयाला मान्यता दिली आहे.

हा नियम जारी झाल्यानंतर ज्यांच्याकडे आधीपासून हे कुत्रे आहेत, त्यांना त्यांची योग्य काळजी घ्यावी लागेल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने २३ हिंसक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घातली होती, ज्यात पिटबुल टेरियर, टोसा इनु, अमेरिकन स्टॅफर्डशायर टेरियर आणि रॉटव्हेलर यांचा समावेश होता. हे कुत्रे माणसांसाठी धोकादायक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते.

२०१३ मध्ये गोव्यात मिशन रेबीज सुरू करण्यात आले होते. १७ मे २०२१ रोजी गोव्याला ‘रेबीज नियंत्रित राज्य’ म्हणून घोषित करण्यात आले.मात्र असे असताना देखील राज्याबाहेरून आणल्या जाणाऱ्या कुत्र्यांमुळे गोव्यात सध्याच्या स्थितीला धोका निर्माण झाला आहे, असे सावंत यांनी २०२३ मध्ये जागतिक रेबीज दिवशी सांगितले होते.

ऑगस्ट २०२३ मध्ये एका रॉटव्हेलरने दोन मुलांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर असगाव आणि हणजूण या गावांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या आणखी दोन घटना घडल्या. असगावमध्ये रॉटव्हेलरने एका ४० वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला होता, त्यानंतर गावाने पिटबुल आणि रॉटव्हेलरसारख्या हिंसक कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी घातली होती. गेल्या वर्षी एका पिटबुलने पाच वर्षांच्या मुलाचा जीव घेतला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पिटबुल आणि रॉटव्हेलर कुत्र्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT