Rottweiler Dogs: कुत्रा चावला, मालकाला पडल्या बेड्या; हल्ल्याला जबाबदार असल्याचा पोलिसांचा आरोप

कुत्र्याच्या हल्ल्याने जखमी झालेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांवर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.
Crime
CrimeDainik Gomantak

Wounded Rottweiler Dogs ओयतीयांत - ताळगाव येथील दोन अल्पवयीन मुलांवर प्राणघातक हल्ला केलेल्या रॉटव्हेलर जातीच्या पाळीव कुत्र्यांचे मालक माधवराव चव्हाण यांना आज पणजी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा तसेच मुलांवरील हल्ल्याला जबाबदार असल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

काल रात्री उशिरा पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध मुलांच्या पालकानी तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल केला होता. गोमेकॉ इस्पितळात या मुलांवर उपचार सुरू असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी दिली.

Crime
Banastarim Bridge Accident: मेघनाच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

या कुत्र्याच्या हल्ल्याने जखमी झालेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांवर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात मुलांच्या कानासह चेहरा, मानेला तसेच छातीला गंभीर जखमा झाल्या आहेत.

काही ठिकाणी उपचारावेळी जखमांना टाके घालावे लागले आहेत. या दोन्ही जखमी मुलांची प्रकृती सुधारत असून धोका टळला आहे. त्यांना देखरेखीखाली इस्पितळात ठेवण्यात आले आहे.

या जखमा बऱ्या होण्यास काही महिने लागतील असे मत या मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीर तरल हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Crime
Goa Solar Power Project: राज्य सरकारने रद्द केला 110 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प

या घटनेची माहिती ताळगाव परिसरात पसरताच तेथील स्थानिक लोकांनी संशयिताच्या बंगल्यासमोर गर्दी केली होती. त्याच्याकडे असलेल्या रॉटव्हेलर या कुत्र्याला पशू संवर्धन खात्याकडे किंवा पंचायतीकडे सुपूर्द करण्याची मागणी केली होती.

या घटनेमुळे लोकांनी संताप व्यक्त करून कुत्र्याच्या मालकावर कारवाई केली जावी, अशी मागणी करत होते.

Crime
Vasco News: वास्कोत दामबाबाचा जयघोष, मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर 'श्रींचरणी' नतमस्तक

कायद्याविषयी पोलिस अनभिज्ञ!

कायद्यानुसार एखाद्याला पाळीव प्राणी घरामध्ये ठेवायचे असल्यास त्यासाठी परवान्याची गरज आहे की नाही याची माहिती पोलिस मिळवत आहेत. कुत्रा घरात पाळण्यासाठी परवाना लागतो की नाही हेच पोलिसांना माहीत नसेल, तर ते काय कारवाई करणार अशी चर्चा नागरिकांत होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com