CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Decision: फार्मागुडीत होणाऱ्या शिवरायांच्या संग्रहालयासह 2 प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी; गोव्याच्या कॅबिनेटमध्ये काय - काय निर्णय झाले?

Goa Cabinet Decisions May 2025: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (28 मे) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. या प्रकल्पांसाठी तब्बल 196 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Manish Jadhav

पणजी: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (28 मे) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. या प्रकल्पांसाठी तब्बल 196 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पर्वरी आणि फार्मागुडी येथे हे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, पर्वरी शहरातील टाऊन स्क्वेअरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुमारे 110 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या स्क्वेअरचा विकास करताना वाहतुकीच्या सोयी, सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी सार्वजनिक सोयीसुविधा लक्षात घेण्यात येणार आहेत.

पर्वरीत खाडीचा विकास

तसेच, पर्वरी (Porvorim) येथील खाडीचा विकास, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पासाठी तब्बल 22 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून पर्यावरणपूरक आणि पर्यटनाला चालना देणारी ही संकल्पना असेल. स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना खाडीच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता यावा यासाठी येथे वॉटर फ्रंट, वॉकवे, लाइटिंग, बोटिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

तसेच, फर्मागुडी येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) संग्रहालयाच्या उभारणीसाठी 64 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या संग्रहालयात शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, युद्धकौशल्य, धोरणशास्त्र, आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गोष्टींचे सादरीकरण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पायाभूत सुविधांचा विकास

दरम्यान, या तीनही प्रकल्पांसाठी आदेश जारी करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. गोव्यातील पायाभूत सुविधा, पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा यांचा विकास करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT