Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांमधला देवदूत! CM सावंतांनी भररस्त्यात ताफा थांबवत अपघातग्रस्त तरुणाची केली विचारपूस

Pramod Sawant Helps Accident Victim: आर्ले-नुवे बायपासवर एक युवक दुचाकीने जात असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला व तो रस्त्याबाजूला पडला. तेथून जाणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाहिली.
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आर्ले-नुवे बायपासवर एक युवक दुचाकीने जात असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला व तो रस्त्याबाजूला पडला. ही घटना तेथून जाणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाहिली. त्यांनी तत्काळ आपली गाडी थांबवत अपघातग्रस्त युवकाची विचारपूस केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आर्ले येथून नुवेच्या दिशेने बायपासवरून येत होते. त्याचवेळी दुचाकीवरून येणारा एक युवक रस्त्याच्या बाजूला जात पडला व अपघात झाल्याचे दिसले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या गाड्यांचा ताफा थांबवण्याच्या सूचना केल्या.

त्यांनी गाडीतून खाली उतरत त्या युवकाची विचारपूस केली. गाड्यांच्या वर्दळीमुळे गोंधळलेल्या दुचाकीवरील युवकाने गाडी बाजूला घेताना गाडी घसरल्याचे सांगितले.

Pramod Sawant
Goa Politics: "हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच एकसमान मानतो, समतोल विकास हाच आमचा ध्यास"; कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

दरम्यान, या युवकाच्या बाजूने एक गाडी भरधाव वेगाने गेली, आपणास त्याच गाडीने युवकाच्या गाडीला धडक दिली असावी, असे वाटल्याने जखमी युवकाला मदत करण्यासाठी आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Pramod Sawant
Goa News: कृष्णा रॉयला ७ दिवसांची पोलिस कोठडी

त्या युवकाने आपणास दुखापत झालेली नसल्याचे सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला सावकाश गाडी चालवण्याचा सल्ला दिला व ते निघून गेले. दुचाकीचालकाच्या मदतीसाठी धावून जाण्याच्या या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa maritime development project
 Pramod Sawant Delhi Meeting
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Silence
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com