Tourist Ticket Fare Dispute Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist: पर्यटन वाढणार कसे? आता पर्यटक आणि बसचालकाचा वाद, जास्त पैसे मागितल्याचा आरोप

Ticket Fare Dispute Madgaon: पर्यटकांनी ही रक्कम देण्यास नकार दिला असता वाद उफाळून आला आणि यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता

Akshata Chhatre

मडगाव : मडगाव बसस्टॉपवरून काहीच किलोमीटरच्या प्रवासातही अधिक शुल्क आकारल्या प्रकरणी केरळमधील पर्यटक आणि गोव्यातील बस कंडक्टर यांच्यामध्ये गोंधळ उडाला. पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी त्यांच्याकडून प्रति व्यक्ती ४० रुपये मागितले गेले, जे की नेहमी १५ ते २० रुपयांपेक्षा अधिक असत नाही. पर्यटकांनी ही रक्कम देण्यास नकार दिला असता वाद उफाळून आला आणि यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता.

या प्रकारानंतर स्थानिकांनी आरटीओ तसेच पोलिसांना अशा घटनांवर वेळीच आळा घालण्याची मागणी केली आहे. पर्यटकांसमोर गोव्याची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी काही नियम कठोर करण्याच्या मुद्यावर त्यांनी भर दिलाय.

रविवारी (दि. २२ डिसेंबर) रोजी घडलेल्या या प्रकारात बस कंडक्टरने केरळमधील प्रवाशांकडून बस स्थानकापासून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी अधिक शुल्क आकारले आणि म्हणून पांडवा चॅपल रोड जंक्शनवर दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. पर्यटकांनी अधिक शुल्क देण्यास नकार दिला असता काही जणांनी पर्यटक महिलांसोबात देखील गैरवर्तणूक केल्याचा दावा काही पर्यटकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT