Goa Chicalim Electric Bus Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Bus Accident: राँग साईडने आलेल्या टॅक्सीला वाचवण्याचा नादात इलेक्ट्रिक बसचा अपघात; चिखलीतील घटना

बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Akshay Nirmale

Chicalim Bus Accident: दक्षिण गोव्यातील चिखली येथे इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला आहे. चुकीच्या बाजूने आलेल्या टॅक्सी ड्रायव्हरसह आणखी एका वाहनधारकाला वाचविण्याच्या नादात बसचालकाने बस दुसऱ्या बाजूला वळवली.

त्यामुळे ती रस्त्याकडेला असलेल्या लोखंडी रेलिंग आणि नारळाच्या झाडांवर जाऊन धडकली. यात बसच्या पुढच्या काचेचा चक्काचूर झाला असून इतरही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झालेले नाही.

चुकीच्या दिशेने आलेल्या टॅक्सी ड्रायव्हरमुळे हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, ही इलेक्ट्रिक बस (GA 08 Y 5410) नारळाची झाडे आणि लोखंडी रेलिंगला धडकून थांबली, अन्यथा तशीच पुढे गेली असती तर मोठा अनर्थ झाला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

दोन गाड्यांना धडक बसू नये म्हणून बसचालकाने गाडी वळवल्याचे प्रत्यक्षदर्शीं सांगताहेत. दरम्यान, येथे वारंवार अपघात होत असतात. गेली कित्येक वर्षे हेच चित्र आहे. दरवर्षी एखादा अपघात येथे होत असतो. हे अपघातप्रवण ठिकाण बनले आहे.

येथील रस्त्यावर असलेले वळण धोकादायक आहे. पण, वारंवार सांगुनही येथे स्पीड ब्रेकर बसवलेले नाहीत, अशी तक्रार स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का, असा सवालही स्थानिकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT