Goa Assembly Session 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2025: माईक बदलले, स्क्रीन झळकली; गोव्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 'हायटेक'

Goa Assembly session: या अधिवेशनात आमदारांची नावे स्क्रीनवर झळकणार आहेत, ही विशेष बाब आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज (दि. 24 मार्च) पासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री असल्याने ते यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अधिवेशनात विरोधी पक्षांकडून सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात आमदारांची नावे स्क्रीनवर झळकणार आहेत, ही विशेष बाब आहे.

विधानसभेतील स्क्रीन बदलली!

या अधिवेशनात विधानसभेत अध्यक्षांच्या आसनाजवळ दोन्ही बाजूंना मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या स्क्रीनवर आमदारांची नावे आणि त्यांच्या पक्षांची चिन्हे डिजिटल स्वरूपात प्रदर्शित केली जातील. यामुळे कोणते आमदार कोणत्या पक्षाचे आहेत, हे ओळखणे सोपे होणार आहे. याशिवाय, विधानसभेतील माईक सिस्टीममध्येही बदल करण्यात आला आहे.

तीन दिवस चालणार अधिवेशन

हे अधिवेशन तीन दिवस चालणार असून पहिल्या दिवशी प्रश्नोत्तरांच्या तासानंतर मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पणजीमध्ये राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे.

या अधिवेशनात सरकारला विरोधकांकडून विविध प्रश्नांवरून घेरले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, पर्यटन क्षेत्रातील समस्या आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विधानसभेतील वातावरण तापण्याची शक्यता असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

"आमचा आवाज दाबला जातो" युरी आलेमाव

सरकारला लोकशाही मार्गाने कामकाज चाललेले नको वाटते. इतर सर्व राज्यांत विरोधकांचे म्हणणे सत्ताधारी ऐकून घेतात, तेथील सभापतीही त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ देतात. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीने (बीएसी) केलेल्या मागणीनुसार सभापतींनी विरोधकांना वेळ देणे आवश्यक आहे. आम्ही केवळ सातजण आहोत; पण तेही भारी पडत असल्याने आमचा आवाज दाबला जातो, अशी प्रतिक्रिया युरी आलेमाव यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT