CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2023: 'या' दिवशी सादर होणार गोव्याचा अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात स्वयंपूर्ण गोवा अभियानावर असणार भर...

Akshay Nirmale

Goa Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पाचे वेध लागतात. गोव्यातही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे अर्थ खाते आहे. एकूण चार दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे.

27 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याच दिवशीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरवात होईल. २७ ते २१ मार्च असे चार दिवस हे अधिवेशन असेल. पैकी पहिल्या दिवशी अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत अर्थसंकल्प सादर करतील.

२०२२-२३ या वर्षात मुख्यमंत्री सावंत यांनी २४ हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात स्वयंपूर्ण गोवा या अभियानावर भर राहणार असल्याचे समजते. याशिवाय पर्यटनाच्या अनुषंगाने विविध विकास प्रकल्पांसाठी तरतुदी केल्या जाऊ शकतात.

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे ती पार्श्वभुमीही राज्याच्या अर्थसंकल्पाला असणार आहे. गोव्यातून दोन खासदार लोकसभेत निवडून जातात.

दरम्यान, गेल्या अर्थसंकल्पातील बहुतांश योजना पुर्ण केल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. सध्या विविध सरकारी खात्यांनी वर्षभरात राबवलेल्या योजना, कामांचा आढावा घेतला जात आहे. सर्व खात्यांकडून याबाबतचे अहवाल मागवण्यात आले आहेत, असे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT