Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: 'कर्ज काढून सण साजरे केले नाहीत', मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; मतदारसंघासाठी 100 कोटींची तरतूद केल्याची दिली माहिती

CM Pramod Sawant: अर्थसंकल्पात प्रत्येक मतदारसंघात १०० कोटी निधीची आर्थिक तरतूद केली. अर्थसंकल्प मंजूर केल्यानंतर १ एप्रिल २०२५ नंतर खर्चाला मान्यता दिली. पणजीत सर्वाधिक १०० कोटी रुपये खर्च झाले.

Sameer Panditrao

पणजी: अर्थसंकल्पात प्रत्येक मतदारसंघात १०० कोटी निधीची आर्थिक तरतूद केली. अर्थसंकल्प मंजूर केल्यानंतर १ एप्रिल २०२५ नंतर खर्चाला मान्यता दिली. पणजीत सर्वाधिक १०० कोटी रुपये खर्च झाले. कुडचडेत ३९, डिचोलीत ३० कोटी, कुंकळ्ळी २० कोटी, फातोर्डा १५ कोटींवर खर्च गेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

मागील वर्षी ४,४०० कोटींची कर्जमर्यादा होती. आम्ही कर्ज घेऊन सण साजरे करीत नाही. त्यामुळे आम्ही केवळ १,५०० कोटींचे कर्ज घेतले आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कर्ज घेतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

‘खेलो इंडिया’मध्ये हरवळे येथील पृथ्वी रितेश नाईक याने जलतरणात तीन पदके मिळविल्या, त्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

क्रीडा खात्यासाठी २०२ कोटींची आर्थिक तरतूद आहे. १२० मैदाने, ४६ संघटना आणि ११२ प्रशिक्षक आहेत, असे उत्तर त्यांनी सांगितले. अनेक खेळांसाठी प्रशिक्षक मिळत नाहीत, असे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी मैदाने आहेत तेथे प्रशिक्षक येतात की नाही, ते आमदारांनी तपासावेत, असे आवाहन केले.

विविध खेळांसाठी किती प्रशिक्षक आहेत, हे सांगून त्यांनी आपण क्रीडा मंत्री झाल्यापासून मलाही प्रशिक्षक भेटलेले नाहीत, असे नमूद केले. ज्या सुविधा आहेत, त्याची माहिती तरी सभागृहात द्यावी. खेलो गोवा योजना सुरू केली असून ती सर्व तालुक्यांत ती सुरू केली जाणार आहे.

इंटर स्कूल प्रोग्राम १४ व १७ वर्षांखालील मुलांसाठी आयोजित केला जात आहे. याशिवाय विविध होणाऱ्या क्रीडा स्पर्धांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

खेलो इंडियाअंतर्गत लागणाऱ्या सुविधा उपलब्ध केल्या जातील, असेही आश्वासन त्यांनी दिले. ‘एनएसएस’द्वारे ३० हजार स्वयंसेवक नोंद झाले आहेत. त्यातून राष्ट्रवादी युवक तयार करण्याचा प्रयत्न आहे. गोवा फुटबॉल संघटनेद्वारे ६ ते १४ वर्षांखालील मुलांसाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. यातून एफसी गोवा किंवा इतर आयएसएल क्लबमध्ये मुले खेळू लागले असून, ही मोठी उपलब्धता आहे. भाऊसाहेब बांदोडकर चषक स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू केली, असेही त्यांनी नमूद केले.

२४ राष्ट्रांत तियात्र

११६ प्रशासक गोव्याच्या संस्कृतीवर संशोधन करण्याचे काम सुरू झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले. २४ पेक्षा जास्त राष्ट्रांत गोव्याचे तियात्र पोहोचले आहे. कला अकादमीचे उर्वरित काम जेवढ्या लवकर होईल ते पूर्ण केले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्टेडियमची स्थिती बिकट: युरी

राज्यातील खेळाडूंना प्रशिक्षण आणि खेळासाठी उपयोगी व्हावे, यासाठी विविध ठिकाणी स्टेडियम उभारले आहेत. त्या स्टेडियमची स्थिती बिकट आहे. शिवाय काहींचा वापर खेळासाठी किंवा क्रीडा स्पर्धांसाठी होत नाही, तर केवळ प्रदर्शनासाठी होत आहे. त्यातून क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूंना प्रोत्साहन कसे मिळणार, असा सवाल युरी आलेमाव यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.

‘अबकारी’तून ९४७.८७ कोटींचा महसूल

अबकारी खात्यावर अनेकांनी टीका केली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, अबकारी खात्याला २०२० मध्ये ४९३.८३ कोटी महसूल मिळाला. २०२४ मध्ये ९४७.८७ कोटींचा महसूल आला आहे, असे सांगत त्यांनी या आकडेवारीवरून पर्यटन वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. मद्य व्यवसायात बेकायदेशीरतेवर ते म्हणाले, दारूच्या बाटल्यांवर दोन तीन महिन्यांत हॉलमार्क असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

SCROLL FOR NEXT