Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Income Tax Return: जर तुमचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये असेल आणि तुम्हाला वाटत असेल की यावर तुम्हाला मोठा टॅक्स भरावा लागेल, तर घाबरण्याचे काही कारण नाही.
Tax Saving Tips
taxDainik Gomantak
Published on
Updated on

Tax Saving Tips: जर तुमचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये असेल आणि तुम्हाला वाटत असेल की यावर तुम्हाला मोठा टॅक्स भरावा लागेल, तर घाबरण्याचे काही कारण नाही. थोडीशी आर्थिक समज आणि योग्य नियोजनाने तुम्ही तुमचे करपात्र उत्पन्न (Taxable Income) इतके कमी करु शकता की, तुम्हाला एकही रुपया कर भरावा लागणार नाही. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2025 आहे, म्हणजे आता फक्त एक दिवस शिल्लक आहे. जर तुम्ही अद्याप तुमचा रिटर्न भरला नसेल, तर लगेच तयारी सुरु करा.

भारत सरकारने नवीन कर प्रणाली (New Tax Regime) अंतर्गत काही विशेष सूट आणि पर्याय दिले आहेत, ज्यांचा योग्य वापर करुन 15 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरही कर वाचवता येऊ शकतो.

Tax Saving Tips
PM Kisan 20th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असा तपासा बॅलन्स

दरम्यान, 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवीन आयकर स्लॅबची घोषणा केली होती. या घोषणेनुसार, नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागणार नाही. पगारदार (Salaried) कर्मचाऱ्यांसाठी प्रमाणित कपात (Standard Deduction) 75,000 रुपये ठेवण्यात आली आहे. यामुळे पगारदार व्यक्तींसाठी 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. म्हणजेच, ज्या कर्मचाऱ्याचे वार्षिक उत्पन्न 12 लाख 75 हजार रुपये आहे, त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.

कराची बचत करण्याचे प्रभावी मार्ग

तसेच, 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर (Tax) वाचवण्यासाठी अनेक प्रभावी पर्याय उपलब्ध आहेत. प्रमाणित कपात (Standard Deduction): सर्वात आधी, प्रत्येक पगारदार कर्मचाऱ्याला 75,000 रुपयांची प्रमाणित कपात मिळते. याचा अर्थ तुमच्या एकूण पगारातून थेट 75,000 रुपये कमी होतात. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS): यात तुमचे नियोक्ता (Employer) तुमच्या मूळ पगाराच्या (Basic Salary) आणि महागाई भत्त्याच्या (DA) 14% हिस्सा तुमच्या एनपीएस खात्यात जमा करतात. यावर तुम्हाला करात मोठी सूट मिळते. उदाहरणार्थ, जर तुमचा मूळ पगार 7.5 लाख असेल, तर एनपीएसमधून तुम्हाला सुमारे 1.05 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

Tax Saving Tips
PM Kisan 20th installment: PM किसान योजनेच्या 20वा हप्त्याची तारीख जाहीर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार पैसे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)

तुम्ही तुमच्या मूळ पगाराच्या आणि महागाई (Inflation) भत्त्याच्या 12% हिस्सा ईपीएफमध्ये जमा करतो, यावरही तुम्हाला कर सवलत मिळते. जर तुमचा मूळ पगार 7.5 लाख असेल, तर तुम्हाला ईपीएफद्वारे जवळपास 90,000 रुपयांची कर बचत होऊ शकते. इतर खर्च (Other Expenses) याशिवाय, तुम्ही तुमच्या कंपनीच्या एचआर (HR) विभागाशी बोलून मनोरंजन, खाण्या-पिण्यावरील खर्च, पेट्रोल आणि प्रवासाचे खर्चही तुमच्या पगारात समाविष्ट करु शकता. या माध्यमातून तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त कपात मिळते.

Tax Saving Tips
PM Kisan: खूशखबर! पीएम किसानच्या 19व्या हप्त्याची तारीख ठरली; 'या' दिवशी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये

आयकर रिटर्न वेळेवर भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे, अंतिम मुदत लक्षात घेऊन लवकरात लवकर आपला रिटर्न भरा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com