Panjim To Vengurla Bus
Panjim To Vengurla BusDainik Gomantak

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

Panjim To Vengurla Bus Service:वेंगुर्ला-सातार्डा बस फेरीच्या अनागोंदी नियोजनामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत होता.
Published on

KTCL Vengurla bus service

वेंगुर्ला-सातार्डा बस फेरीच्या अनागोंदी नियोजनामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत होता. नियमित प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक, कामगार तसेच शालेय विद्यार्थ्यांना या असुविधेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा वेळेत बस न मिळाल्याने शाळकरी मुले उशिरा पोहोचत होती, तर कामगार व नोकरदार वर्गालाही अडचणींना सामोरं जावं लागत होतं.

या पार्श्वभूमीवर गोव्यातील कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KTCL) मदतीला धावून आली आहे. बराच काळ प्रलंबित असलेल्या मागणीचा विचार करून, अखेर वास्को-वेंगुर्ला आणि पणजी-वेंगुर्ला या दोन महत्त्वाच्या बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे सीमाभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Panjim To Vengurla Bus
Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

पणजी-वेंगुर्ला मार्गावर सुरू करण्यात आलेली बस पर्वरी, म्हापसा, करासवाडा, कोरवाळ, धारगळ, पेडणे, सातार्डा, मळेवाड, वेंगुर्ला या मार्गे धावणार असून, परतीच्या प्रवासातही त्याच मार्गाने पणजीकडे जाणार आहे. यामुळे गोवा व कोकणदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि वेळेत होणार आहे.

पणजी डेपोचे डेपो मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, वेंगुर्ला आगारातील स्थानिकांनी अद्यापही असलेल्या काही त्रुटींवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जरी कदंबाने मदतीचा हात दिला असला तरी महाराष्ट्र परिवहन महामंडळानेही योग्य नियोजन करून स्थानिकांना दिलासा द्यावा.

Panjim To Vengurla Bus
Goa Crime: बनावट ग्राहक पाठवला, सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; मास्टरमाईंडला बेळगाव येथून अटक

स्थानिक प्रवासी संघटनांनी कदंबाच्या या निर्णयाचं स्वागत करत, "अखेर कदंबा मदतीला धावून आली" असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे वेंगुर्ला परिसरातील शालेय विद्यार्थी, प्रवासी व कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com