पटियाला, पंजाब येथून कुटुंबासोबत गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आलेले हरिंदरजीत (वय ४१) यांचा मंगळवारी दुःखद अंत झाला. कांदोळी येथील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. पहाटे ४.०६ वाजता कळंगुट पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हरिंदरजीत यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बांबोळी येथील जीएमसी येथे जतन करण्यात आला आहे.
आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाटंबार्से (Latambarse) मतदारसंघातील भाजप उमेदवार पद्माकर मळीक यांच्या प्रचारकार्याला आज उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. आजी-माजी आमदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लाडफेच्या श्री सातेरी केळबाई देवीच्या चरणाकडे श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा श्रीगणेशा (प्रारंभ) करण्यात आला.
डिचोली येथील बगलमार्गावर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या एका अपघातात वाहनाच्या धडकेमुळे एका गाईचा जागीच मृत्यू झाला. तसेच, अन्य एक गोधन (गुऱ्हाळ) या अपघातात जखमी झाले आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन गुरांचा बळी जात असल्याने, स्थानिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची मागणी केली आहे.
कोळशाकात कारापूर येथे एका विवादित मालमत्तेतील घरात राहणाऱ्या वासंती सालेलकर या महिलेचा त्याच घरात वीजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ह प्रकरण घातपाताचे असल्याचा दावा सदर महिलेच्या घरच्यांनी तसेच गाकुवेध फेडरेशनचे उपाध्यक्ष रामकृष्ण जल्मी, मयेतील युवानेते अँड. अजय प्रभुगावरक यांनी केला आहे. सदर महीला राहत असलेल्या मालमत्तेचा विषय न्यायप्रविष्ट होता. या मालमतेच्या विषयावरून या महिलेवर अनेकदा हल्लेही झाले होते. अशी माहिती समोर आली आहे.
पाळी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिलेल्या सुर्लचे माजी सरपंच भानुदास सोननाईक यांच्या प्रचाराला पाळी मतदारसंघात प्रारंभ करण्यात आला. सुर्ल येथील श्री सिध्देश्वर मंदिरात, श्री मल्लिकार्जुन मंदिरात तसेच पाळी येथील श्री नवदुर्गा देवीचे दर्शन व सांगणे घालून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे मोठे मताधिक्य पाळी मतदारसंघात असून गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अल्प मतांच्या आघाडीवर काँग्रेसने आणले होते.
२०२५ या वर्षातील शेवटचा 'सुपरमून' उद्या (गुरुवारी) गोव्याच्या आकाशात दिसेल. सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा, सुपरमून तेव्हा होतो जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असतो आणि नेमक्या त्याच वेळी पौर्णिमा येते. यामुळे चंद्र नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा आणि अधिक चमकदार दिसतो. गोव्यात, हा चंद्र सायंकाळी ५:२२ वाजता उगवेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:५० वाजेपर्यंत तो आकाशात दिसेल.
सरकारने जाहीर केलेली पर्यटकांची संख्या जास्त असूनही प्रत्यक्षात मैदानावर पर्यटकांची दृश्यमानता कमी का आहे, या प्रश्नाला उत्तर देताना कळंगुटचे आमदार आणि हॉटेल व्यावसायिक मायकल लोबो यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण मांडले. ते म्हणाले की, गोव्यात गेस्ट हाऊस, हॉटेल्स, भाड्याच्या खोल्या आणि एअरबीएनबी यांसारख्या निवास युनिट्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गोवा उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे, त्यानुसार सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यापूर्वी कस्टम्स अधिकाऱ्यांना BNSS कलम ३५(३) ची नोटीस जारी करणे आवश्यक नाही.
हा निर्णय १.११ कोटी रुपयांच्या अवैध दारूगोळा आयात प्रकरणात घेण्यात आला आहे. न्यायालयाने ह्यूजेस प्रिसीजनचे व्यवस्थापकीय संचालक (MD) संजय सोनी आणि व्यवस्थापक जयेश शेट्ये यांचा जामीन रद्द केला असून, त्यांना त्वरित डीआरआय (DRI) समोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. डीआरआयच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. आशा देसाई यांनी युक्तिवाद केला.
RGPची उद्या 13 ते 14 उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता; युती तुटल्यास 'एकला चलो रे'चा नारा?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.