Goa Crime Dainiak Gomantak
गोवा

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Bori Murder Case Goa: खाजोर्डा-बोरी येथे दीपक नाईक याच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्यानंतर फरार झालेल्या मुख्य संशयित आरोपीच्या मुसक्या फोंडा पोलिसांनी आवळल्या.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: खाजोर्डा-बोरी येथे दीपक नाईक याच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्यानंतर फरार झालेल्या मुख्य संशयित आरोपीच्या मुसक्या फोंडा पोलिसांनी आवळल्या. तोर्ल-शिरोडा येथील दुर्गम भागात आपल्या मावशीच्या घरी लपून बसलेल्या गौरेश कुशन नाईक याला फोंडा पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून चोवीस तासांच्या आत हा छडा लागल्याने फोंडा पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

खाजोर्डा-बोरी येथे क्षुल्लक कारणावरून दीपक राया नाईक याला त्याचे पुतणे गौरेश कुशन नाईक तसेच साईदीप कुशन नाईक या दोघाहीजणांनी मारहाण केली होती. या मारहाणीवेळी गौरेश नाईक याने घरातून कुऱ्हाड आणून दीपक नाईक याच्या मानेवर वार केला होता. वार वर्मी बसल्याने दीपक नाईक याचे जागीच निधन झाले होते.

दीपक नाईक याचा खून झाल्याचे पाहून आकांताने त्याच्या पत्नीने पोलिस स्थानकात धाव घेऊन या बाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ चौकशीला सुरवात केली. दरम्यान, मयत दीपक नाईक याच्यावर फोंडा मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस या खूनप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

दुचाकीवरून काढला होता पळ

आपल्या हातून खून झाल्याचे पाहून गौरेश नाईक याने दुचाकीवरून पळ काढला होता. त्याला पकडण्यासाठी फोंडा पोलिसांनी सगळीकडे तपास केला, मात्र कुठेच पत्ता लागत नसल्याने शेवटी तोर्ल भागात गौरेश नाईक असण्याची शक्यता वाटल्याने पोलिसांनी तोर्ल - शिरोडा येथे गौरेश नाईक याच्या मावशीच्या घरी धाव घेतली. बिचाऱ्या वृद्ध मावशीला आपला पुतण्या खून करून आल्याचे माहीतच नव्हते. पोलिसांनी घराची तपासणी केली असता आतमध्ये दुचाकी कपड्याने झाकून ठेवल्याचे निदर्शनास आल्यावर लपलेल्या गौरेशला पोलिसांनी ताब्यात घेतले. गौरेश हा रोजंदारीवर काम करायचा. विशेषतः झाडे कापण्याचे काम तो करायचा. या झाडे कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कुऱ्हाडीनेच त्याने दीपकवर वार केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT