Goa Board result 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Board result 2023: गोवा बोर्डाचा 12 वी चा निकाल जाहीर, यंदा 95.46 टक्के निकाल; जाणून घ्या सविस्तर...

गतवर्षी लागला होता 92.66 टक्के निकाल; दहावीचा निकाल मेच्या मध्यात जाहीर होणार

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Board result 2023: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (GBSHSE) 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज, शनिवारी (ता. 6) जाहीर करण्यात आला आहे. पर्वरी येथील उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातील परिषद सभागृहात हा निकाल जाहीर करण्यात आला.

यंदाचा बारावीचा निकाल 95.46 टक्के लागला आहे. एकूण 19 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी 18 हजार 497 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींचा टक्का 95.88 टक्के असून मुलांचा टक्का 95.03 टक्के इतका आहे. 49 जणांचे निकाल विविध कारणांमुळे राखून ठेवले आहेत.

मंडळाच्या www.gbshse.in तसेच http://results.gbahsegoa.net// या वेबसाईटवर हा निकाल पाहता येईल. दरम्यान, दहावीचा निकाल मेच्या मध्यात जाहीर होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एकूण 9661 मुलांनी परीक्षा दिली पैकी 9181 मुले उत्तीर्ण झाली. तर 9716 मुलींनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 9316 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

शाखानिहाय (फॅकल्टीवाईज) निकाल

आर्ट्स 4940 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, पैकी 4701 उत्तीर्ण झाले. या विभागाचा निकाल 95.16 इतका लागला आहे.

कॉर्मस विभागाचा निकाला सर्वाधिक 96.52 टक्के इतका लागला आहे. या शाखेत 5980 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी 5772 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तर विज्ञान विभागाचा निकाल 96.19 टक्के लागला आहे. या शाखेत 5244 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५०४४ जण उत्तीर्ण झाले.

व्होकेशनल विभागात 3213 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 2980 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विभागाचा निकाल 92.75 टक्के लागला आहे.

खासगी विद्यार्थी

75 खासगी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 37 पास झाले. 49.33 टक्के इतका हा निकाल आहे.

आयटीआय

तर आयटीआयमध्ये 43 जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी 30 जण उत्तीर्ण झाले. 8 जणांचे निकाल राखून ठेवले आहेत. एकूण टक्केवारी 69.77 टक्के इतकी आहे.

रिपीटर विद्यार्थी

एकूण 291 रिपीटर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी 180 पास झाले आहेत. ही टक्केवारी 61.86 इतकी आहे.

दिव्यांग विद्यार्थी

141 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पैकी 138 जण उत्तीर्ण झाले. 97.87 टक्के इतका हा रिझल्ट आहे.

गतवर्षी म्हणजेच 2022 मध्ये बारावीचा निकाल 92.66 टक्के इतका लागला होता. सोमवार 8 मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून शाळेच्या लॉगईनवरून निकाल डाऊनलोड करता येईल. विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊनलोड करू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

SCROLL FOR NEXT