Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर अनर्थ टळला! प्रवाशाने केला विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न

179 प्रवाशांचा जीव घातला धोक्यात; हिमाचलच्या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak

Dabolim Airport: विमानाचा आप्तकालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करून विमानातील क्रुसह 179 प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार दाबोळी विमानतळावर एका फ्लाईटमध्ये शनिवारी घडला आहे. तथापि, एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधित प्रवाशाला रोखल्याने अनर्थ टळला.

Dabolim Airport
Bilawal Bhutto India Visit: पाकिस्तान दाऊदला भारताकडे सोपवणार का? काय म्हणाले बिलावल भुट्टो, वाचा...

इंडिगोच्या गोवा-हैदराबाद या फ्लाईटमध्ये हा प्रकार समोर आला. एका प्रवाशाने विमानाच्या आप्तकालीन दरवाजाचे हँडल खेचण्याचा प्रयत्न केला. तथापि, विमानातील क्रु सदस्यांनी त्याला वेळीच रोखले, त्यामुळे अनर्थ टळला. विशाल शांडिल्य सिंग असे त्याचे नाव असून तो मूळचा हिमाचल प्रदेशचा आहे. या निष्काळजीपणाबद्दल त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com