Damu Naik In Delhi Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील घडामोडींवर दिल्लीत खल, पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

Damu Naik BL Santhosh Meeting: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

या बैठकीनंतर नाईक यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना सांगितले की, पुढील आठवड्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत दिल्लीत महत्त्वपूर्ण राजकीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

संघटनात्मक कामाच्या निमित्ताने प्रदेश सरचिटणीसांसह नाईक काल (गुरुवारी) रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले होते. भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर संतोष यांच्यासोबत राज्यातील राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाली.

नाईक यांनी सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीदरम्यान येऊ शकणाऱ्या आव्हानांचा अहवाल सादर करण्यात आला असून २०२७ मध्ये पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी पक्षाकडून सुरू असलेल्या तयारीची माहितीही देण्यात आली.

राज्य मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्याबाबत चर्चेचा मुद्दा उपस्थित झाला का, या प्रश्नावर नाईक यांनी थेट उत्तर देणे टाळले. “बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, तपशील उघड करता येणार नाही. काही निर्णय सरकारच्या अखत्यारीत येतात आणि ते घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत केली जाते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पोटनिवडणुकीसंदर्भातही बैठकीत चर्चा झाल्याचे नाईक यांनी मान्य केले. “ही निवडणूक जिंकण्यासाठी केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा दिला. फोंड्यातील जनतेच्या अपेक्षांबाबतही नेतृत्वाला माहिती दिली,” असे ते म्हणाले.

नाईक म्हणाले, “राजकारणातील प्रत्येक घडामोडीकडे बारकाईने पाहून त्याचे विश्लेषण केले जाते. भाजपमध्ये त्यासाठी ठरलेली कार्यपद्धती आहे आणि त्यानुसारच पुढील निर्णय घेतले जातील.”

भंडारी समाज प्रतिनिधित्वावर चर्चा

राज्यात भंडारी समाजाला अधिक राजकीय प्रतिनिधित्व देण्याच्या मागणीबाबत केंद्रीय नेतृत्वाची भूमिका काय, असा प्रश्न विचारल्यावर नाईक म्हणाले की, “एखाद्या एकाच मुद्द्यावर मतप्रदर्शन झालेले नाही. सर्वसमावेशक धोरणात्मक निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातील. या विषयावर पुढील आठवड्यातील बैठकीत अधिक स्पष्टता येईल.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: सांकवाळमध्ये गुदिन्होंना धक्का, पंचायतीत अकस्मात खांदेपालट; सरपंच, उपसरपंचांची माघार; ग्रामसेवकही बदलले

Goan Cashew: गोव्याच्या नावावर आफ्रिकन काजू खपवाल तर खबरदार! कठोर कारवाई होणार; CM प्रमोद सावंतांचा कडक इशारा!

Horoscope: भाग्य उजळणार! शनिवारी 3 राशींच्या नशिबात प्रचंड धनलाभाचे योग, रखडलेली कामे पूर्ण होऊन मिळेल मोठे यश

VIDEO: मडगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई; 7.4 किलो गांजा जप्त, ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT