भारतानं पाकड्यांना पुन्हा तोंडावर पाडलं! वायुसेनेच्या डॉक्युमेंट्समुळे पाक लष्कराचा खोटारडेपणा जगासमोर; काय घडलं नेमकं?

IAF Tender Exposes Pakistan Rafale Claim: 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताची अनेक राफेल विमाने पाडल्याचा दावा करणाऱ्या पाकड्यांचा खोटारडेपणा आता अधिकृत पुराव्यांसह जगासमोर आला.
IAF Tender Exposes Pakistan Rafale Claim
IAF Tender Exposes Pakistan Rafale ClaimDainik Gomantak
Published on
Updated on

IAF Tender Exposes Pakistan Rafale Claim: "खोट्याला पाय नसतात" ही म्हण पाकिस्तानच्या बाबतीत पुन्हा एकदा खरी ठरली. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताची अनेक राफेल विमाने पाडल्याचा दावा करणाऱ्या पाकड्यांचा खोटारडेपणा आता अधिकृत पुराव्यांसह जगासमोर आला. जून 2026 मध्ये भारतीय वायुसेनेने जारी केलेल्या एका नवीन सरकारी टेंडरने हे सिद्ध केले की, फ्रान्सकडून खरेदी केलेली सर्व 36 राफेल विमाने पूर्ण ताकदीने भारतीय सैन्यात तैनात असून पाकड्यांच्या दाव्याला काही एक अर्थ नाही.

भारतीय वायुसेनेच्या मुख्यालयातून नुकत्याच जारी करण्यात आलेल्या 'रिक्वेस्ट फॉर प्रपोजल' (RFP) नुसार, सध्या सेवेत असलेल्या सर्व 36 राफेल विमानांच्या देखभालीसाठी आणि तांत्रिक सहाय्यासाठी पाच महिन्यांच्या 'ब्रिज सपोर्ट पॅकेज' अंतर्गत निविदा मागवण्यात आल्या. हा अधिकृत दस्तऐवज सप्टेंबर 2026 नंतरही राफेलचा ताफा पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी लॉजिस्टिक्स आणि देखभाल सुनिश्चित करतो. या पाच महिन्यांच्या कालावधीत विमानांच्या 2250 उड्डाण तासांचे नियोजन करण्यात आले.

IAF Tender Exposes Pakistan Rafale Claim
Pakistan Statement Controversy: "पाकिस्तान आम्हाला प्रिय'', अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर रिपब्लिकन सिनेटर्सचा हल्लाबोल, म्हणाले, 'आधी तुमचे खरे मित्र ओळखा!'

दीर्घकालीन कराराला अंतिम रुप मिळेपर्यंत राफेलच्या कारभारात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ही तात्पुरती व्यवस्था आहे. या निविदेतील '36' ही संख्या स्पष्ट करते की भारताने एकही राफेल विमान गमावलेले नाही, कारण तसे झाले असते तर टेंडरमधील विमानांची संख्या कमी झाली असती.

IAF Tender Exposes Pakistan Rafale Claim
Pakistan Crime: पवित्र गुरुद्वारात रक्ताचा सडा! पाकिस्तानात शिख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या; आक्रमक भाजपची आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक आणि जोरदार एअरस्ट्राइक केली होती, ज्याला 'ऑपरेशन सिंदूर' नाव देण्यात आले होते. या कारवाईत झालेल्या स्वतःच्या नुकसानावर पांघरुण घालण्यासाठी पाकिस्तानने (Pakistan) राफेल पाडल्याचा खोटा प्रोपेगंडा सोशल मीडियावर चालवला होता.

IAF Tender Exposes Pakistan Rafale Claim
Pakistan Donkey Meat Export: चिनी कंपनीनं धमकी देताच पाकड्यांची तरारली, शाहबाज सरकारनं गाढवाच्या मांस निर्यातीला दिली मंजुरी; काय नेमकं प्रकरण?

दरम्यान, भारत आता 'MRFA' कार्यक्रमांतर्गत फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीकडून आणखी 114 अतिरिक्त राफेल विमाने खरेदी करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झाली असून, 'मेक इन इंडिया' अंतर्गत यातील बहुतांश विमानांची निर्मिती 50 टक्के स्वदेशी साहित्यासह भारतातच केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com