

पणजी: भाजप सरकारने काही महिन्यांपूर्वी केलेल्या मतदार यादींच्या मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेमुळे राज्यातील सुमारे १.३९ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. विरोधी पक्षांच्या ताब्यातील मतदारसंघांमधून अशा अनेक तक्रारी समोर आल्या असून ज्या मतदारांच्या तक्रारी आहेत, त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर’ सुरू केल्याची माहिती आमदार ॲड. कार्लोस फेरेरा यांनी दिली.
काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ॲड. अमित पालेकर आणि सावियो कुतिन्हो यांची उपस्थिती होती. फेरेरा म्हणाले की, लोकांना कोणतीही नोटीस न देता त्यांची नावे यादीतून वगळली गेली आहेत.
कुतिन्हो म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर मतदार यादीतील कथित गैरव्यवहारांबाबत सातत्याने व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ४ नोव्हेंबर २०२५ पासून गोव्यातील एसआयआर प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. ॲड. पालेकर म्हणाले, सर्व नागरिकांना तातडीने आपले नाव मतदार यादीत तपासण्याचे आणि कोणतीही अडचण असल्यास जीपीसीसीच्या हेल्पलाई नं. ७८७५८३३८३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.