Damu Naik And Ajit Pawar Dainik Gomantak
गोवा

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

Damu Naik Criticized Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्याची गोव्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Manish Jadhav

पणजी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्याची गोव्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता गोव्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पुण्यात पाहणी दौऱ्यावर असताना अजित पवारांना एका महिलेने वाहतूक समस्येवर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा दाखला दिल्यानंतर, कोण पर्रीकर? असे विधान त्यांनी केले होते. यावर आता गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पवारांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

अजित पवारांच्या वक्तव्यावर नाईक म्हणाले, 'मनोहर पर्रीकर हे असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या नावाने केवळ गोवाच नव्हे, तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ यासारख्या मोठ्या शहरांमध्येही अनेक संस्था आणि केंद्रे उभारण्यात आली आहेत.'

'वेड पांघरुन पेडगावला जाणे'

नाईक यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर सडेतोड टीका केली. 'मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची माहिती नसणे म्हणजे 'वेड पांघरुन पेडगावला जाणे' असेच म्हणावे लागेल.' असा टोला नाईकांनी पवारांना लगावला.

एवढचं नाहीतर, मनोहर पर्रीकरांना कमी लेखणे किंवा ते माहीत नसणे म्हणणे यातून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याचे राजकीय अज्ञान दिसून येते, असा घणाघातही नाईकांनी केला.

मनोहर पर्रीकर हे केवळ गोव्याचेच नव्हे, तर देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव होते. त्यांचे शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. ते एक कुशल प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले नेते होते, असेही पुढे बोलताना नाईक म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्रातील एका वजनदार नेत्याने केलेल्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांमधील राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, हे विधान नकळत झाले असावे, तर काहीजण याला भाजपच्या एका प्रतिष्ठित नेत्याला जाणूनबुजून कमी लेखण्याचा प्रयत्न मानत आहेत.

सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे सुरु झालेला हा वाद लवकर संपण्याची शक्यता कमी आहे. गोवा भाजप या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेऊन अजित पवारांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रातील भाजपचे नेते यावर कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT