Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: 2027 मध्ये राज्यात पुन्हा भाजपच येणार, स्पष्ट बहुमत मिळणार! रोहन खंवटेंनी विरोधकांच्या 'भूलथापां'चा उडवला धुव्वा

Minister Rohan Khaunte statement: खंवटे यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पर्वरी: भाजप पर्वरी मंडळाच्या युवा समितीची घोषणा नुकतीच करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटन तथा माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. यावेळी खंवटे यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. युवकांनी सोशल मीडियावरील अफवा आणि विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्ष कुंदा चोडणकर, दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगावकर, अमित अस्नोडकर, पेन्ह-द-फ्रान्काचे सरपंच सपनील चोडणकर, सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणेकर, पर्वरी महिला मोर्चा अध्यक्ष रिना फर्नांडिस, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष दत्ताराम रेडकर, मंडळ अध्यक्ष विनीत बोरकर, सचिव अशोक शेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नवी युवा समिती पुढीलप्रमाणे : जगन्नाथ कांबळी अध्यक्ष, उपाध्यक्ष राज पेडणेकर, अभिजीत मोरजकर, रामा नाईक, सरचिटणीस- अखिलेश देसाई, स्वागत नाईक, मयूर प्रभू, सचिव- कार्तिक कळंगुटकर, डिलन फर्नांडिस, सनत आर्लेकर. सदस्य : शाश्वत कामत, दीपराज नाईक, सुनील पाटील, गौरेश गावस, प्रवीण आजगावकर, इब्राहीम मरकब्बी, गौरेश प्रियोळकर, सागर नाईक, विवेक पेडणेकर, आशिष नाईक, राज पार्सेकर, कुणाल साळगावकर, कुणाल चोडणकर, समीर गावडे, सचिन कुंडईकर, राजाराम शेटगावकर, एन्ड्रयू फर्नांडिस, रूपेश नाईक, अनिकेत मडकईकर, प्रथमेश चोडणकर, मोहन नाईक.

युवती विभाग अध्यक्षपदी तन्वी दळवी

यावेळी जगन्नाथ कांबळी यांच्या नेतृत्वाखाली पर्वरी युवा समिती जाहीर करण्यात आली. युवती विभागाच्या अध्यक्षपदी तन्वी दळवी यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्यांचा मंत्री खंवटे यांच्या हस्ते भाजपची शाल परिधान करून सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT