Goa Bjp Election rally Dainik Gomantak
गोवा

Goa: केपेत भाजपचा सहज विजय

सदानंद तानावडे : सरकारच्या कोविड काळातील कार्याचे जनतेकडून कौतुक

Dhananjay Patil

केपे : कोविड काळात केंद्र सरकारने लोकांसाठी जे कार्य केले, त्याला तोड नाही.(Goa) त्याचबरोबर राज्य सरकारनेही ही महामारी रोखण्यासाठी जे काम केले, ते लोकांनी पाहिले आहे. यासाठी हे सरकार खऱ्या अर्थाने लोकांचे आहे, असे (Bjp) गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Tanavde) यांनी केपे येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तानावडे यांनी आज (गुरुवारी) केपे मतदारसंघाचा दौरा केला. भाजपने जे कार्य केले, ते पाहिल्यास केपे मतदारसंघात पक्षाचा सहज विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, (Babu Kavalekar) केपे मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, नगरसेवक प्रसाद फळदेसाई, अमोल काणेकर, अवेडेचे सरपंच अलेलूया आफोंसो, योगेश कुंकळयेकर, संदीप फळदेसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

‘सेवा ही संघटन’ हे या पक्षाचे ब्रीद असून कोविड महामारीत आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले कार्य केले, हे लोकांनी पाहिले आहे. (Sadanand Tanavde) केपेत या महामारीच्या काळात केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी सुसज्ज असे कोविड निगा (Covid Center) केंद्र सुरू करून लोकांना चांगली सुविधा दिली; पण याच्या विरोधात विरोधकांनी फक्त लोकांची दिशाभूल करण्यापलीकडे काहीच केले नाही. विधानसभा निवडणूक ही ठरलेल्या वेळेतच होणार आहे. केपेतून आता बाबू कवळेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने केपेत भाजप मजबूत झाला आहे. जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुकीत भाजपने यश संपादन केल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा विश्‍वास तानावडे यांनी व्यक्त केला. विरोधकांनी कितीही आवाज केला तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सरकारच सत्तेवर येणार, असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar)यांनी सांगितले. भाजपने कोविड महामारीच्या सुरवातीपासून झोकून दिले आहे. पण आता कोणीतरी लोकांना धान्य वाटून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. केपेत (Goa) भाजपचे (Bjp) कमळ फुलणार, असे कवळेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT