Goa: भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्तंभ

भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्तंभ होते, शिवाय बहुजन समाजाचे नैतृत्व करत असताना सर्व समाजाला एकत्रित घेवून कार्य केले.
भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्थंभ
भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्थंभ Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्तंभ होते, शिवाय बहुजन समाजाचे नैतृत्व करत असताना सर्व समाजाला एकत्रित घेवून कार्य केले. त्यांचे पुण्य कार्य आज कुणीही विसरू शकत नाही, त्यांचा वारसा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चालवला, तोच वारसा आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत चालवत असल्याचे उद्गार मांद्रेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन दयानंद सोपटे यांनी मांद्रे येथील भाऊसाहेब बांदोडकर गार्डन कडे भाऊंची 48 पुण्यतिथी साजरी केल्यानंतर ते बोलत होते.

भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्थंभ
Goa: केपेत भाजपाच जिंकून येईल - तानावडे

मांद्रे भाजपा तर्फे भाऊसाहेब बांदोडकर यांची 48 पुण्यतिथी भाजपातर्फे साजरी करण्यात आली. यावेळी मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब , हरमल माजी सरपंच अनंत गडेकर, उद्योजक संतोष कोरखणकर, मांद्रे भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष दीपा तळकर, अनिशा केरकर, पार्से सरपंच प्रगती सोपटे, उत्तर गोवा महिला अध्यक्ष नयनी शेटगावकर, राज्य उपाध्यक्ष एकता चोडणकर, माजी सरपंच धनंजय शेटगावकर, अनिल आसोलकर, माजी सरपंच संतोष बर्डे, श्रीधर मांजरेकर, महेश मांद्रेकर, पंच डेनिस ब्रिटो ,माजी सरपंच रामा नाईक आदी उपस्थित होते.

भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्थंभ
गोव्याच्या कळंगुट किनाऱ्यावर तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने खळबळ

आमदार दयानंद सोपटे यांनी पुढे बोलतांना भाऊसाहेब बांदोडकर हे पहिल्यांदा मांद्रे मतदार संघातून निवडून येवून मुख्यमंत्री बनले. भाऊंची प्रतिमा समोर ठेवून आम्हाला त्यांचे जे उर्वरित काम आहे ते पूर्ण करण्याची गरज आहे. भाऊनी गरिबांसाठी खूप काही केले, जी दयानंद सामाजिक योजना 100 रुपयांनी चालू केली होती ती आजही सरकारने चालूच ठेवली. शिक्षणासाठी त्यांचे उपक्रम राबवले त्याला तोड नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण करुया, अनाथांना आधार देण्याचे काम जसे भाऊसाहेब बांदोडकर यांनी केले त्याच पद्धतीने काम मनोहर पर्रीकर यांनी केले. पूर्ण जीवन जनतेसाठी अर्पित केलेल्या महान नेत्याना आदरांजली देताना आम्हाला आमचा मतदार संघ विकासाच्या प्रगतीपथावर न्यायाचा आहे असे त्यांनी सांगितले.

महिला मोर्चा अध्यक्ष दीपा तळकर यांनी बोलतांना भाऊसाहेब बांदोडकर यांनी घालून दिलेल्या आदर्श आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला पुढे जायचे आहे. असे सांगून भाजपा त्यांच्या विचारातून सरकार चालवत असल्याचा दावा दीपा तळकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com