Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa BJP News: सशक्त, सुरक्षित समाज हेच भाजपचे 'ध्येय'

Goa BJP: भारतीय जनता पक्ष केवळ विकासच करीत नाही, तर सशक्त समाज, सुरक्षित समाज ध्येय बाळगून कार्यरत असतो.

दैनिक गोमन्तक

Salcete: भारतीय जनता पक्ष केवळ विकासच करीत नाही, तर समाजातील प्रत्येक घटक सशक्त व सुरक्षित व्हावा यासाठी सशक्त समाज, सुरक्षित समाज हे ध्येय बाळगून कार्यरत असतो. भाजप आरोग्य, स्वच्छता यावर जास्त भर देत आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केले.

भाजप युवा मोर्चा व महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने कोंब - मडगाव येथील विमलाबाई कारे सभागृहात सेवा पंधरवडाअंतर्गत आयोजित आरोग्य चिकित्सा शिबिराचे समई प्रज्वलित करून उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

एक दिवसीय आरोग्य चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्‍घाटन सोहळ्यास मडगावच्या उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, नगरसेवक सगुण नायक, दामोदर शिरोडकर, युवा मोर्चाचे मडगावचे अध्यक्ष अक्षय पारकर, महिला मोर्चाच्या अध्यक्ष तनुजा पैंगीणकर, सचिव सोनल म्हापसेकर, शर्मद रायतुरकर, योगिराज कामत उपस्थित होते.

राज्य महिला मोर्चाच्या सरचिटणीस रंजिता पै यांनी सर्वांचे स्वागत केले, तर अक्षय पारकर यांनी आभार मानले. या आरोग्य शिबिरात कान, डोळे, रक्त, मधुमेह व इतर आजारांची तपासणी करण्यात आली, रुग्णांना आरोग्य केंद्रामार्फत मोफत औषधे देण्यात आली.

तसेच, या आरोग्य चिकित्सा शिबिरात डॉ. प्रतिष्ठा कुंकळ्येकर, डॉ. पूर्वा वाघ पै काणे, डॉ. विजेता जांबावलीकर, डॉ. नीरज बोरकर, डॉ. शौरी केंकरे, डॉ. सायली कुडचडकर यांनी रुग्णांची तपासणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: नदीतून बाहेर येताच पोरीनं घातली लाथ, अतरंगी रीलचा सोशल मीडियावर धूमाकूळ; नेटकरी हैराण

Konkan Tourism in Monsoon: हिरवाई, धबधबे आणि समुद्रकिनारे... पावसात खुललेलं 'कोकण', निसर्गाच्या कुशीतली 10 अप्रतिम स्थळं, नक्की भेट द्या

SA vs AUS: कांगांरुंची दैना उडवत दक्षिण आफ्रिकेनं मोडला 31 वर्ष जुना रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव, केशव महाराज ठरला विजयाचा 'हिरो'

Goa Police Attack: रस्त्यात अडवून पोलिसांना मारहाण, बेतूल घटनेनंतर वास्कोत 'गुंडाराज'; गोव्यात पोलिसांवर हल्ल्यांची मालिका?

Mumbai Heavy Rain: रस्ते पाण्याखाली, लोकल बंद, विमानसेवा विस्कळीत... देशाची 'आर्थिक राजधानी' तुंबली, पूरसदृश परिस्थितीने नागरिक हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT