Goa: तिरंगा सायकल रॅलीत सहभागी झालेले मुरगाव मतदारसंघातील युवक व युवती. Dainik Gomantak
गोवा

Goa: वास्कोत भाजपतर्फे तिरंगा सायकल रॅली

Goa: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन

Yeshwant Patil

दाबोळी : मुरगाव मतदारसंघात भाजपतर्फे (Marmgoa BJP) तिरंगा सायकल रॅलीचे (Bicycle rally) आयोजन स्वातंत्र्याच्या (Independence Day) अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आले होते. मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर (Sanjay Satardekar) यांनी या रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी गटाध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी मुरगाव मतदारसंघात मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्या नेतृत्वाखाली मुरगावचा चौफेर विकास चालू असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत देशात विकासाची गंगा वाहत आहे, असे सांगितले.

तिरंगा सायकल रॅलीला मंत्री मिलिंद नाईक यांच्या बोगदा येथील शासकीय निवासापासून सुरवात करण्यात आली. नंतर ती जेटी, हेडलँड सडा, रूमडावाडा, बायणा व शेवटी बायणा समुद्रकिनाऱ्यावर सांगता झाली. या सायकल रॅलीत सहभागी झालेल्यांना प्रशस्तिपत्रे देण्यात आली. यावेळी गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, नगरसेविका कुणाली पार्सेकर, नगरसेवक रामचंद्र कामत, दामोदर नाईक, लिओ रॉड्रिगीस तसेच मुरगाव भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सोमनाथ बांदेकर उपस्थित होते. एकूण ६० जणांनी या सायकल रॅलीत भाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT