CM Pramod Sawant | Goa News Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: फुटिरांना मिळणार संधी; तर काही मंत्र्यांचे 'पत्ते कट'!

Pramod Sawant: तसेच काहीजणांना महामंडळ सोडावे लागणार, अशी एकच चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: काँग्रेसमधून आठ आमदार फुटून भाजपमध्ये आल्याच्या घटनेला दोन महिने झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखेर त्यांना दिलेल्या आश्‍वासनावर भाष्‍य केले आहे. केंद्रीय नेतृत्व आणि आपल्यावर विश्‍वास ठेवूनच काँग्रेसचे ‘ते’ आठजण फुटून भाजपमध्ये आले.

त्यापैकी काहीजणांना मंत्रिपदे व महामंडळे दिली जातील, असे जाहीररित्या त्यांनी सूतोवाच केले आहे. परिणामी मंत्रिमंडळात फेरबदल होणार, हे निश्‍चित आहे. त्यामुळे काही मंत्र्यांचे पत्ते कट होणार तसेच काहीजणांना महामंडळांचेही बलिदान द्यावे लागणार, अशी चर्चा सुरू आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी स्पष्टीकरण दिले. काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये आलेल्यांमध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, संकल्प आमोणकर, आलेक्स सिक्वेरा, रुडाॅल्फ फर्नांडिस आणि राजेश फळदेसाई यांचा समावेश आहे.

आज मुख्यमंत्री सावंत यांनी या आठजणांपैकी काहींना मंत्रिपद देण्याचे आश्‍वासन दिल्याने ते पूर्ण करावे लागणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

आयोगामार्फत भरती

यापुढे नोकर भरती कर्मचारी निवड आयोगामार्फतच होईल. पुढील 15 दिवसांत आयोगासाठी वेगळी व्यवस्‍था केली जाईल. नव्या वर्षात पहिल्याच महिन्यात आयोग नोकर भरती करेल. आयोग स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामार्फत घेतला आहे. त्यामुळे कोणीही नाराज नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

‘त्यांना’ घरी जावेच लागणार

कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतात. कामचुकारांवर कारवाईचे पाऊल सरकारने उचलले आहे. त्यामुळे कामचुकारांना सक्तीने घरी जावेच लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आठ तास काम करायलाच हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT