Goa Congress
Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोवा सरकार ‘मिशन टोटल कमिशन’ मध्ये सामील, CCI ला लिहणार पत्र - काँग्रेस

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : गोवा सरकार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटदारांना त्रास देऊन राज्यात 'मिशन टोटल कमिशन'चा फॉर्म्युला राबवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी 'भारतीय प्रतिस्पर्धा आयोग'ला पत्र लिहिणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके यांनी शनिवारी काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजप सरकार गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, युवक काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष रिनाल्डो रुझारियो उपस्थित होते.

'भ्रष्टाचारामुळे '40 टक्के सरकार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप आमदारांना कर्नाटक जनतेने घरचा रस्ता दाखवला. गोव्यातही ते ‘मिशन टोटल कमिशन’ मध्ये सामील आहेत. पीडब्ल्यूडी कंत्राटदारांकडून ‘कमिशन’ मागण्यात पीडब्ल्यूडी कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा हात आहे.' असा आरोप भिके यांनी केला.

'पीडब्ल्यूडी कंत्राटदार सरकारी कामे करण्यासाठी स्वतःचे पैसे गुंतवतात. मात्र, त्यांचा छळ केला जातो. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे पीए अगदी निविदा प्रक्रिया करण्यासाठीही कमिशन घेतात. मुख्यमंत्र्यांचे कार्यालयही तेच करत आहे. हे कमिशन घेण्यासाठी निविदांचे नियमही डावलले जातात.'

'शासनाचे विभाग सायलेंट मोडवर गेले आहेत. “पीडब्ल्यूडीची कामे संथ गतीने सुरू आहेत. इथे फक्त भ्रष्टाचार होत आहे. फक्त ‘बॅग’ची देवाणघेवाण होते. राज्यात कोणतेही काम पूर्णत्वाच्या अवस्थेत दिसत नाही. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत.' असे भिके म्हणाले.

पीडब्ल्यूडीमध्ये होत असलेल्या कथित भ्रष्टाचार आणि कंत्राटदारांना झालेल्या छळाची चौकशी करण्यासाठी 'भारतीय प्रतिस्पर्धा आयोगा'ला पत्र लिहिणार असल्याची माहिती भिके यांनी यावेळी दिली.

एकदा पाऊस सुरू झाला की पणजीतील स्मार्ट सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचार उघड होईल, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Supreme Court: 11,600 झाडे तोडण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयात; केंद्र अन् राज्य सरकारकडे मागितले उत्तर

Goa Today's Live Update: थिवीत रविवारी तीन तास वीज पुरवठा विस्कळीत राहणार

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

SCROLL FOR NEXT