Goa Government | Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

Goa Government: गोव्याचे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच नाही- सदानंद शेट तानावडे

Goa Government: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर आहे. विकासाची गतीही ‘डबल इंजिन’द्वारे सुरू असताना मुख्यमंत्री बदलण्याची शक्यताच नाही. मुख्यमंत्री बदलला जाईल ही अफवा असून विरोधकांकडून ती पसरविली जात आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.

पेडणे येथील प्रसिद्ध पुनवेला आल्यानंतर देवदर्शन घेऊन स्थानिक पत्रकारांशी तानावडे बोलत होते. पत्रकारांनी राजकारणाबाबत प्रश्‍‍न विचारले असता ते म्‍हणाले की, मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच नाही.

काँग्रेसमधून भाजपमध्‍ये आलेल्‍या आमदारांना पक्षाने कोणतेच आश्वासन दिलेले नाही. किंवा एखाद्या मंत्र्याला वगळून त्याच्‍या जागी दुसरा मंत्री बसवला जाण्याची शक्यताही त्‍यांनी फेटाळून लावली. दरम्‍यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही पुनव उत्‍सवाला उपस्‍थिती लावून श्रींचे दर्शन घेतले.

आर्लेकरांच्‍या मंत्रिमंडळ समावेशाबाबत नंतर बघू

पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना भविष्यात मंत्रिमंडळात घेणार का, असा प्रश्न केला असता तानवडे म्‍हणाले की, सध्या आर्लेकर यांच्याकडे हस्तकला महामंडळ आहे. या मंडळामार्फत ज्या योजना आहेत.

तसेच, त्या मतदारसंघाबरोबरच प्रत्येक राज्यात पोहोचविण्याचे ते काम करीत आहेत. सध्या मंत्रिमंडळाचा आकडा कमी प्रमाणात असल्याने तो वाढविता येत नाही. एखाद्या वेळी भविष्यात पुढच्या निवडणुकीत काहीही बदल घडू शकतो. ते काय ते नंतर बघू.

..तर 'त्‍यांना' आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल

  • मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना भाजपमध्‍ये प्रवेश देणार का, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, मगोचे आमदार तथा ज्‍येष्‍ठ नेते सुदिन ढवळीकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिलेला आहे.

  • जीत आरोलकर यांना पक्षात यायचे असेल तर थेट त्‍यांना घेता येणार नाही. आमदारकीचा राजीनामा देऊन त्‍यांना यावे लागेल आणि सध्या तरी तसा प्रस्ताव आपल्यापर्यंत आलेला नाही. तसा प्रस्‍ताव आला नंतर त्‍यावर भाष्‍य करू. दरम्‍यान, पेडणे तालुक्यात तीन मतदारसंघ होणार का, असा प्रश विचारला असता या निवडणुकीत तरी शक्य नसल्याचे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

''वीज खात्यान जाय तशे फोडून दवरल्यात रस्ते'' खड्डेमय रस्त्यांवरून पर्यटनमंत्र्यांचा 'वीजमंत्र्यांवर' निशाणा; Watch Video

SCROLL FOR NEXT