Goa Government: गोव्यात फिजिओथेरपीसाठी मंडळ स्‍थापणार!

Goa Government: फिजिओथेरपीला राष्ट्रीयस्तरावर वेगळे मंडळ स्थापन करुन सरकारची मान्यता देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील.
Goa Government | Pramod Sawant
Goa Government | Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: बालवयापासून वृद्धावस्थेपर्यंत आवश्‍यक असलेल्या फिजिओथेरपीला राष्ट्रीयस्तरावर वेगळे मंडळ स्थापन करून सरकारची मान्यता देण्यासाठी राज्‍य सरकार प्रयत्नशील राहील. डॉक्टर माणसाचा जीव वाचवतात तर फिजिओथेरपिस्ट त्‍याचे जीवन सुखमय आणि निरामय होण्यासाठी मदत करतात.

दरम्यान, त्यामुळे लहानांपासून अर्थातच बालवय ते वृद्धावस्थेपर्यंत कोणत्याही आजारानंतर फिजिओथेरपी महत्त्वाची ठरली आहे. जलदगतीने विकसित होत असलेली ही उपचारपद्धती जीवनातील प्रत्येक पायऱ्यांवर आवश्‍यक ठरली आहे, असे उद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

Goa Government | Pramod Sawant
Anant Salkar Passed Away: ज्येष्ठ पत्रकार अनंत साळकर यांचे निधन

फोंड्यातील मिनिनो ट्रेड सेंटरमध्ये काल रविवारी युवा फिजिओ परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री सावंत यांनी मार्गदर्शन केले. सुरूवातीला निदान भारतीय वैद्यकीय पद्धतीत फिजिओथेरपीला समाविष्ट करुया. नंतर त्‍यास सरकारमान्यता मिळणे सोपे ठरेल, असे ते म्‍हणाले. यावेळी परिषदेचे डॉ. अली तसेच डॉ. केतन भाटीकर, इतर मान्यवर उपस्थित होते.

तसेच, क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनीही या फिजिओ परिषदेला भेट देऊन क्रीडा क्षेत्रात फिजिओथेरपिस्टचा अवलंब करण्याची ग्वाही दिली. केतन भाटीकर यांनी स्वागत केले व त्‍यांनीच शेवटी आभार मानले.

Goa Government | Pramod Sawant
Goa News: कार्डिनल फिलीप नेरी फेर्रांव यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

अनेक व्‍याधींवर फिजिओथेरपी रामबाण उपाय

कर्करोग, ह्रदयरोग तसेच अन्य मोठ्या आजारांवर उपचारावेळी फिजिओथेरपीचा चांगला प्रभाव राहिला आहे. बदलती जीवनशैली आज जीवनासाठी घातक ठरली आहे. धकाधकीच्या जीवनात माणूस आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

त्यामुळेच विविध व्याधी माणसाला जडल्या असून अशा व्याधींमुळे शरीरातील हाडे, स्‍नायू कमकुवत होत असल्याने अनारोग्याच्या समस्या उद्धवत आहेत. या अनारोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी फिजिओथेरपीसारखा दुसरा चांगला उपाय नाही. त्यामुळेच शस्त्रक्रिया असो किंवा छोट्या मुलांच्या शारीरिक व्यंगांच्या तक्रारी, फिजिओथेरपीला पहिले प्राधान्य आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

Goa Government | Pramod Sawant
Goa Petrol Price: अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या दरात घसरण, गोव्यातील नवीन दर तपासा

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री-

देशात आणि जगभरात कोविड महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या महामारीमुळे अनेकांच्या शरीरावर विपरित परिणाम झाले. अशा रुग्णांना त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण हा फिजिओथेरपीमुळे मिळाला. हाडांचे विकार तसेच स्नायूंच्या मजबूतीसाठी फिजिओथेरपीचा अवलंब प्रभावी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com