Goa BJP Mahila Morcha 

 

Dainik Gomantak

गोवा

‘तृणमूल’ गोळा करते महिलांची खासगी माहिती

भाजप महिला मोर्चाची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

दैनिक गोमन्तक

पणजी : राजकीय फायद्यासाठी तृणमूल काँग्रेस राज्यातील महिलांची खासगी माहिती गोळा करत आहे. या प्रकाराला आळा बसावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती मोर्चाच्या अध्यक्ष शीतल नाईक यांनी दिली.

येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महिला मोर्चा प्रभारी सुलक्षणा सावंत, सरचिटणीस शिल्पा नाईक,  रंजिता पै, गीता कदम, ॲड. कुणाली मांद्रेकर उपस्थित होत्या.

यावेळी शीतल नाईक म्हणाल्या की, भाजप (Goa BJP) सरकारने 2012 साली महिलांसाठी मासिक 1500 रुपये अर्थसाहाय्य देणारी ‘गृहआधार’ योजना सुरू केली. दरवर्षी या योजनेवर 236.40 कोटी रुपये राज्‍य सरकार खर्च करत आहे. या योजनेचा लाभ राज्यातील 1 लाख 31 हजार 131 महिलांना मिळतोय. सोबत दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील महिलांना आणि विधवांना दोन हजार रुपये मदत केली जाते.

गोव्याच्या (Goa) योजनांची नक्कल करून तृणमूल काँग्रेसतर्फे (Congress) ‘गृहलक्ष्मी’ योजना जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ही योजना जाहीर करताना महिना ५ हजार रुपये देण्याचे जे आश्वासन निवडणुकीवर (Election) डोळा ठेवून दिलेले आहे, ते पूर्ण करणे अशक्य आहे. या योजनेच्या नावाखाली महिलांकडून त्यांची खासगी माहिती गोळा करण्यावर नियंत्रण यावे, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी भाजप महिला मोर्चाने निवडणूक आयोगाला निवेदन दिले आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

पश्चिम बंगालमध्ये ‘लक्ष्मी भांडार’ नावाची एक योजना ममता बॅनर्जी यांनी सुरू केली आहे. मात्र सर्व महिलांना त्याचा लाभ मिळत नाही. फक्त महिना 500 रुपये दिले जातात. तेही 25 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना. त्यामध्येही नियमितता नाही, असा आरोप भाजप महिला मोर्चा प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem: "आमची शेती जिवंत करा, अन्‍यथा खाणीवर धडक देऊ"! मयेतील शेतकरी आक्रमक; महिनाभराची दिली मुदत

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रांवचा वारसदार कोण...

Fatorda: हृदयद्रावक! बेडरूमचे दार लावले, बाल्कनीतून घेतली उडी; फातोर्ड्यात 73 वर्षीय वृद्धाने संपवले जीवन

Panaji: पणजीवासीयांसाठी अपडेट! ‘सिटीज 2.0’ उपक्रम राबवला जाणार; पायाभूत सुविधा होणार मजबूत

Goa Politics: '2027 ची विधानसभा निवडणूक हे युद्धच, तयारीला लागा'! दामू नाईकांचे कार्यकर्त्यांना आवाहन; प्रदेशाध्यक्षपदाची वर्षपूर्ती

SCROLL FOR NEXT