मडगाव : पेडणे मतदारसंघातून भाजपने प्रवीण आर्लेकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे तिथे पक्षासाठी डोईजड झालेले उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी मडगावातून उभे राहावे अशी ऑफर कार्यकारणीकडून देण्यात आली आहे. बाबू मडगावात राहिल्यास गटबाजीवरही आपोआप नियंत्रण येईल असे भाजपला वाटते. मात्र, आपल्याला मडगावातून निवडणूक लढविण्यास रस नाही असे आजगावकर यांनी कळविले.
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले, की आम्ही बाबूंना मडगावातून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली आहे. कारण त्यांना मडगावात (Margaon) भक्कम बेस आहे. भाजप उमेदवारीवर ते सहज जिंकू शकतात असा विश्वास तानावडेंनी व्यक्त केला. मडगावात बाबूंची स्वतःची ३ आणि भाजपची ६ ते ७ हजार मते आहेत. मडगाव सर करायला एवढी मते पुरेशी आहेत अशी भाजप नेत्यांची धारणा आहे.
दरम्यान मला अशी ऑफर होती. मडगावचा असलो तरी पेडणे (Pedne) ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मडगावामधून उभे राहण्याची इच्छा नाही, हे मी पक्षाला कळवले आहे, असे बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.